ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक मध्ये आदर्श शेतकरी पुरस्कार

अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक येथे अगळावेगळा बैलपोळा अनुभवण्यास मिळाला.आपल्यासोबत शेतात राबणाऱ्या, खांद्याला खांदा लावून सदैव साथ देणाऱ्या या सवंगड्यांप्रती मनोमन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली त्याचबरोबर दिवसेंदिवस यांत्रिकीकरणाच्या युगात बैल जोडींची संख्या कमी होऊ त्यांची जागा ट्रॅक्टरने घेऊन बळीराजाची साथ केली असुन त्याच जाणीवेतून संपूर्ण गावाने बैलांसोबत ट्रॅक्टर अगदी

थाटामाटात सजवून त्यांचे पुजन करुन मिरवणूक काढुन जणुकाही ट्रॅक्टर पोळाच साजरा केला.गावाच्यावतीने वर्षभर शेतात ऊन वारा पाऊसाची तमा न बाळगता काबाडकष्ट करत आपली शेती फुलवून देशाची गरज भागवतो म्हणून बळीराजाचा देखील सन्मान होणे आवश्यक आहे त्या अनुशंगाने उंचखडक बुद्रुक मध्ये “बैलपोळा समिती स्थापन” केरुन त्या समितीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष पदी गावचे प्रगतशील शेतकरी तसेच हुन्नरी व्यक्तीमत्व श्री.बाळासाहेब सिताराम देशमुख (बापु) यांची तर

प्रयोगशील युवा शेतकरी श्री.मंगेशशेठ खरात यांची सेक्रेटरी म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.यंदाच्या वर्षापासून या समितीच्यावतीने ज्या बळीराजाने नाविन्यपुर्ण शेती करुन तसेच समाजीक बांधीलकी ठेवत गावातील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परंपरांचे जतन केले अशा बळीराजाला “आदर्श शेतकरी सन्मानाने” सन्मानित करण्यात आले.यावर्षाचा प्रथम क्रमांकाने बळीराजा श्री.गणेश भाऊसाहेब खरात, व्दितीय क्रमांकाने बळीराजा श्री.सचिन रमेशराव देशमुख व तृतीय

क्रमांकाने बळीराजा श्री.विजय दशरथ मंडलिक यांना आदर्श शेतकरी सन्मानाने सन्मानीत करण्यात आले.या सन्मान सोहळ्यासाठी अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे जेष्ठ संचालक तसेच श्री सद्गुरू यशवंतबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे उपाध्यक्ष आदरणीय श्री. अशोकराव देशमुख, कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे अभियंते तसेच कल्याण येथील नुतन शिक्षण संस्थेचे संचालक आदरणीय श्री.नंदकुमार देशमुखसाहेब,रोकठोक सार्वभौमचे संपादक श्री.सागर शिंदेसर,बुवासाहेब नवले मल्टीस्टेटचे संचालक तसेच उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे

उपसरपंच श्री.महिपाल देशमुख (बबनदादा) त्याचबरोबर उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे सरपंच सौ.सुलोचनाताई शिंदे,सदस्य श्री.संजय गावंडे,सौ.भारती कीशोर मंडलिक ग्रामपंचायत सदस्य,उंचखडक बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटीचे व्हा.चेअरमन श्री.वाल्मिक शशिकांत शिंदे,जेष्ठ संचालक श्री.शांतारामआप्पा देशमुख,श्री.बाळासहेब खरात, श्री.मनोहरराव देशमुख,श्री.कुंडलिक मंडलिक साहेब,

माजी उपसरपंच श्री.सुगंधराव देशमुख, माजी चेअरमन श्री.अशोकदादा रं देशमुख,ट्रस्टचे विश्वस्त श्री. दिलीपराव मंडलिक,श्री.देवराम पाटील शिंदे,श्री.रमेशआण्णा देशमुख,श्री.विलासराव हासे,श्री.किशोरनाना मंडलिक, बबनराव खरात,राजेंद्र शिंदे,विजय मंडलिक,राजेंद्र चाफेकर,उद्धव देशमुख,अंकुश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते सोबत गावातील जेष्ठ,लहान थोर-मोठे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now