ताज्या घडामोडीमनोरंजन

अखेर पेडगाव येथे एसटी बस थांबण्यासाठीच्या विद्यार्थ्याच्या लढ्याला यश

एसटी बस थांबण्यासाठीच्या विद्यार्थ्याच्या लढ्याला यश

परभणी : तालुक्यातील मौजे पेडगांव सय्यद मियां पिंपळगाव एसटी बस सेवा मागील लॉकडाऊन काळापासून बंद करण्यात आली होती या विषयी परभणी आगार प्रमुखांना गावातील विद्यार्थ्यांनी निवेदनाद्वारे एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी केली होती आगार प्रमुखांनी प्रवास धारकांची प्रवासांची गैरसोय लक्षात घेता परभणी

सय्यद मियां पिंपळगाव , पेडगाव मार्गाने जाणारी बस सेवा आज 6 सप्टेंबर रोजी सुरू करण्यात आली याबद्दल गावांतील विद्यार्थ्यांनी चालक व वाहक यांचे स्वागत करण्यात आले प्रवासाची गैरसोय दुर झाल्याने गावातील नागरिकांतून आनंद व्यक्त केला जात आहे यावेळी शाहू नंद , अबुजर खान , अन्सार पठाण , रोहित खरात , मुंजा संसारे , सईद सय्यद , आविष्कार नंद, गोविंद वाघमारे ,पंकज नंद आदिंची उपस्थित होती.

Share now