महाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

अतिवृष्टीग्रस्तांना नुकसान भरपाई द्या.खासदार. संजय जाधव

अजहर शेख हादगावकर. आज परभणी अतिवृष्टी व पूरामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब सानूग्रह अनुदान म्हणजे आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी माझ्यासह शिष्टमंडळाने केली. यावर्षीच्या जूलै महिन्यात परभणी जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस म्हणजे अतिवृष्टी झाली. त्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होवून शेतकर्‍यांच्या तूर, कापूस, सोयाबीन, मूग,

उडीद, ज्वारी, बाजरी आदी खरीप पिकांचे अतोनात असे नुकसान झाले आहे. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून ते चिंताग्रस्त बनले आहेत, असे जिल्हाधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यात पुन्हा जवळपास तीन आठवडे पावसाने दडी मारली. त्यामुळे उरलीसुरली पिकेही वाया गेली. त्यातून शेतकर्‍यांचे खूप आर्थिक नुकसान झाले. परंतु, कृषि आणि महसूल विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त शेतकर्‍यांना वगळ्याने ते आर्थिक

मदतीपासून वंचित राहीले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली असून त्यांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. अतिवृष्टी व पूराने पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना ताबडतोब सानूग्रह अनुदान म्हणजे आर्थिक नुकसान भरपाई द्यावी, अन्यथ या प्रश्‍नावर शिवसेना संपूर्ण जिल्ह्यात तीव्र आंदोलन उभारेल, असा इशारा दिला. या निवेदनावर जिल्हाप्रमुख विशाल कदम, जिल्हाप्रमुख सुरेश ढगे,

सहसंपर्कप्रमुख डॅा.विवेक नावंदर,जि.म.सह. बॅंक संचालक अतुल सरोदे, संजय सारणीकर,युवासेना प्रमुख अर्जुन सामाले, दिपक बारहाते,मंगलताई कथले, ज्ञानेश्‍वर पवार, मुंजा कदम, जितेश गोरे, कृष्णा पिंगळे, बालाजी दहे, मिनल कदम, नवनाथ देशमुख, राहुल पाटील, आप्पा बनसोडे, सुनील पंटरकर, विकास वैजवाडे, शुभम पाष्टे, पांडुरंग शिंदे, गोकुळ लोखंडे, रविंद्र धर्मे, प्रभाकर खंदारे, संतोष गवळी, सत्यनारायण घाटूळ, माणिकराव काळे, अशोक वाघ यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Share now