आम मुद्देताज्या घडामोडी

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एक्करी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी

संपादक अहमद अन्सारी .पाथरी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना एक्करी ५० हजार रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी संविधान सूरक्षा आंदोलनाच्या वतीने पाथरीचे तहसिलदार यांच्या कडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. सदर निवेदनावर नमुद करण्यात येत आहे की गेल्या महिनाभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकन्यांचे आतोनात नुकसान झाले असून शेतकरी देशोधडीला लागला आहे .

अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात लागवड केलेली सर्व पिकं जमीनदोस्त झाली आहेत . जगभरात पसरलेल्या कोरोंनाच्या महामारीमुळे आधीच सामान्य जणांचे कंबरडे मोडले असून सर्व सामान्यांना हालाखीचे जीवन जगावे लागत आहे . त्यात भरीस भर म्हणून गेल्या महिना भरापसून अविरतपणे होत असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीतील पीकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून गेला आहे . या परिस्थितीत हातबल झालेल्या शेतकऱ्यांना एक्करी ५० हजार रुपये नुकसान भरपाई

देण्यात यावी अशी मागणी संविधान सुरक्षा आंदोलनाच्या वतीने पाथरीचे तहसिलदार श्रीकांत निळे यांच्या कडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे . सदर निवेदनावर संविधान सूरक्षा आंदोलनाचे केंद्रीय अध्यक्ष गौतमदादा ब्रम्हराक्षे, जिल्हाध्यक्ष शेख खुर्शीदभाई , जिल्हा उपअध्यक्ष सादेक बागवान , मनोज गवळी, शहर अध्यक्ष खीजर फारोखी, अशोक नरवडे, सादेक बागवान, मधुकर धनले, महेश केंद्रे, अदीत्य विटेकर, बाबासाहेब कसबे, अनिरुद्ध वंजारे, ज्ञानोबा भदर्गे, संविधान सूरक्षा आंदोलन विद्यार्थी आघाडीचे संघर्ष ब्रम्हराक्षे, अंकुश सवने आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Share now