ताज्या घडामोडी

अल्पसंख्याक मुलींनी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे लाभ घ्यावे. सय्यद मिनहाजोद्दीन

अल्पसंख्याक मुलींनी बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्तीचे लाभ घ्यावे. सय्यद मिनहाजोद्दीन

बीड (प्रतिनिधी) अल्पसंख्याक मंत्रालय मार्फत बेगम हजरत राष्ट्रीय शिष्यवृत्ती चे मुलींनी जास्तीत जास्त फॉर्म भरावे असे आवाहन मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन यांनी केले आहे. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालय मार्फत दिली जाणारी शिष्यवृत्ती

अल्पसंख्याक मुलींसाठी मौलाना आझाद एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती ही शिष्यवृत्ती नववी ते बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या सर्व अल्पसंख्याक मुलींसाठी लागू आहे. नववी ते दहावी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी पाच हजार रुपये (5000) व अकरावी ते बारावी वर्गात शिकणाऱ्या मुलींसाठी सहा हजार रुपये ते 12 हजार रुपये

शिष्यवृत्ती मिळेल शिष्यवृत्ती अर्ज भरण्याची कलावधी 21 जुलै ते 10 सप्टेंबर 2022 पर्यंत आहे. अर्ज भरण्या साठी लागणारे कागदपत्र पुढीलप्रमाणे आहे. विद्यार्थिनीच्या आधार कार्ड बँक पासबुक मोबाईल सोबत असणे मागच्या वर्षीच्या गुणपत्रक मार्क मेमो उत्पन्न प्रमाणपत्र वडील किंवा आईच्या असावा विशेष म्हणजे इतर शिष्यवृत्तीधारक बेगम हजरत महल राष्ट्रीय शिष्यवृत्ती योजनेच्या फॉर्म भरू शकत नाही.

धार्मिक अल्पसंख्याक किंवा वेगम हजरत महल फक्त एकच स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात अधिसूचनेनुसार मुस्लिम ख्रिश्चन बुद्ध पारसी आणि जैन या अल्पसंख्याक मुलींसाठी लागू राहील कमीत कमी 50 टक्के गुण मिळणाऱ्या विद्यार्थी ना शिष्यवृत्ती दिली जाईल. या योजनेचा लाभ अल्पसंख्याक विद्यार्थिनी घ्यावे असे आवाहन मौलाना आझाद सेवाभावी संस्थेचे सचिव सय्यद मिनहाजोद्दीन यांनी केले आहे.

Share now