आम मुद्देताज्या घडामोडी

अवैध बायो डिझेल विक्री विरोधात पेट्रोल पंप चालकांचे शिष्टमंडळ पालकमंत्र्यांना भेटले

आज अवैध बायोडिझेल विक्री च्या विरोधात नांदेड जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांचे शिष्टमंडळ पालक मंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण यांना भेटून नांदेड जिल्ह्यात होत असलेल्या अवैध बायो डिझेल विक्री विरोधात तात्काळ प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली पालकमंत्री नामदार अशोकरावजी चव्हाण यांनी उपस्थित असलेले जिल्हाधिकारी विपीन विटणकर व पोलीस

अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांना त्वरित अवैध मार्गाने विक्री होत असलेल्या बायोडिझेलच्या विरुद्ध कार्यवाही करावी अशा सक्त सूचना देऊन अवैध बायोडिझेल विक्रीला आळा नाही बसल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या इन्चार्ज ला जबाबदार धरून कार्यवाही करण्यात येईल असंही सांगितलं त्यामुळे *पेट्रोल पंप चालकांनी स्वातंत्र्य दिनापासून खरेदी व विक्री बंद आंदोलन तूर्त स्थगित केले आहे* या शिष्टमंडळात असोसिएशनचे सतीश राव किनाळकर चैतन्य बापू देशमुख बालाजी बच्चेवार सौ आशाताई पाटील शिरीष पाटील पप्पू कोंडेकर विजय केशतवार मंगेश पावडे किशनराव वाघआळेकर नितीन लाटकर योगेश पाटील कुमार लालवानी नाशेर लाला प्रज्योत अनंतवार अजिंक्य पवार तरोडेकर देशमुख मधुकर मानेकर ज्ञानेश्वर लोकमंनवार नवीन भाई राठोड आधी पदाधिकाऱ्यांसह पेट्रोल पंप चालक उपस्थित होते

Share now