ताज्या घडामोडीमनोरंजन

आज पाथरी नगरपरिषदत दोन कार्डियाक अम्ब्युलन्स लोकार्पण सोहळा संप्पन

शेख इफ्तेखार बेलदार. पाथरी येथील आज दिनांक. 22/07/2021 रोजी पाथरी नगरपरिषदेत राज्याचे अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांनी प्रत्येक आमदाराला कोविड व इतर वैद्यकीय सुविधांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी दिला. या निधीचा सदुपयोग चांगल्या कार्यासाठी व्हावा या हेतूने आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी 60 लक्ष रुपये खर्च करून दोन कार्डियाक अँबुलन्स खरेदी केल्या. आज मुद्दामहून दादांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचे लोकार्पण करण्यात आले.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व इतर गंभीर आजारी रुग्णांना परभणी, औरंगाबाद, पुणे, मुंबई यासारख्या शहरात स्थलांतरित करावे लागते. जिल्ह्यात साधारण रुग्णवाहिका असल्याने अनेक गंभीर रुग्ण वाटेतच दगावतात. कार्डियाक अँबुलन्स नसल्याने त्याची आमदार बाबाजानी दुर्राणी यांना खरंच गरज वाटली. त्यामुळे अत्याधुनिक रुग्णवाहिका पाथरी शहर व ग्रामीण भागात इतर तालुक्यातील नागरिकांना मिळावी, रुग्णांचे स्थलांतर करणे सोयीचे जावे. यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून सर्व सोयींनी युक्त अशा दोन कार्डियाक अम्बुलन्स पाथरी नगर परिषदेला आज सुपूर्द केल्या. आवश्यकता असल्यास याचा उपयोग पाथरीसह मानवत, सेलू व परिसरातील नागरिकांनी सुद्धा घ्यावा, सर्वांसाठी या रुग्णवाहिका उपलब्ध असतील.

या कार्डियक रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, ईसीजी, व्हेंटिलेटर, सीरिज पंप, मॉनिटर अशा सर्वच सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे गंभीर आजारी रुग्णांसाठी ही रुग्णवाहिका अत्यंत उपयुक्त ठरेल असा विश्वास आहे. जनसामान्यांसह आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांचे जीवन मौल्यवान असून ते सुरक्षित असणे मला गरजेचे वाटते. त्यामुळे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सुसज्ज आणि अद्यावत रुग्णवाहिका देण्याचा निर्णय घेतला. यामुळे रुग्णांची सेवा करण्याचा योग मला मिळाला.

कोरोनाच्या काळात आरोग्य विभागावर प्रचंड ताण निर्माण झाला आहे, त्यामुळे रुग्णवाहिकां देखील अपूऱ्या पडतात. काहीवेळी रुग्णांना वेळेवर रुग्णालयात दाखल करता येत नाही. अद्यावत रुग्णवाहिकेमुळे रुग्णांना निश्चितच दिलासा मिळेल, अशा भावना उपस्थित सर्व डॉक्टरांनी व्यक्त केल्या. या अत्याधुनिक व्हेंटिलेटरयुक्त कार्डियाक रुग्णवाहिकेच्या माध्यमातून अनेक जीव वाचणार आहेत, त्यामुळे सर्व डॉक्टर व नागरिकांनी आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्या आभार मानले.

व आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी सांगितले की उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार महाराष्ट्र राज्य यांचे मनापासून आभार मानतो, की त्यांनी कोरोना महामारीच्या काळात आम्हाला लोकप्रतिनिधींना स्थानिक विकास निधीतून १ कोटी रुपये आरोग्य व वैद्यकीय सुविधांवर खर्च करण्याची परवानगी दिली. त्यांनी घेतलेल्या या महत्वपूर्ण निर्णयाचा गौरव व्हावा म्हणून दादांच्या वाढदिवसानिमित्तच याचे लोकार्पण केले.असे बोलताना आमदार बाबाजानी दुर्राणी

Share now