ताज्या घडामोडीमनोरंजन

आझादी गौरव यात्रेची सुरुवात

गंगाखेड प्रतिनिधी. भारत देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त परभणी जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज गंगाखेड येथील संत जनाबाई मंदिर येथून ‘आझादी गौरव यात्रे’ची सुरुवात करण्यात आली.

भारतीय स्वातंत्र्य लढ्याची गौरव गाथा जनतेत बिंबवण्यासाठी व भारत देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना व प्रसंगी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या

हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी ही पदयात्रा काढण्यात येत आहे.पदयात्रेत काँग्रेस पक्षाचे जिल्ह्यातील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उत्स्फूर्त उपस्थित होते.

Share now