आदिवासी तरुणाच्या कुटुंबाला प्रेरणा ताई वरपुडकर यांनी भेट दिली
प्रतिनिधी अन्वर खान. आज दिनांक २८-०७-२०२१ परभणी जिल्हातील पाथरी वाघाळा येथील रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेळेवर उपचार न झाल्यामुळे मृत्यू झालेले आदिवासी तरुणाच्या कुटुंबाला प्रेरणा ताई वरपुडकर यांनी भेट दिली आणि बैलगाडी वरून आदिवासी वस्तीच्या रस्त्याची पाहणी केली व

आदिवासी वस्ती च्या लोकांना रस्ता ऑक्टोबरच्या सुरवातीस पक्या स्वरूपात तयार करून देऊ असे आश्वासन दिले आहे. आदिवासी वस्तीच्या लोकांना भेटदेण्या वेळेस वाघाळ्याचे सरपंच भागवत घुंबरे उर्फ बंटी काका उपस्थित होते तरीसुद्धा आदिवासी वस्तीच्या लोकांची मागणी आहे की रस्ता लवकरात लवकर पक्क्या स्वरूपात तयार करून देण्यात यावेत.