राजकिय घडामोडी

आमदार रत्नाकर गुट्टे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

गंगाखेड/प्रतिनिधी:- मोसीन खानआज दिनांक.१७ जुलै शनिवार रोजी गंगाखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे भेट घेऊन गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामे, शेतकऱ्यांच्या समस्या व त्यांना करावी लागणारी आर्थिक मदत या बाबतीत चर्चा करत विकासकामांना आवश्यक निधीची मागणी केली.

पिंपळदरी मंडळास मंजूर असलेला सोयाबीन पीकविमा व गंगाखेड मतदारसंघात तूर, ज्वारी इत्यादी पिकांचा विमा राज्य सरकार व विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याची मागणी केली. यावर्षी अतिवृष्टीने बाधित पिकांच्या नुकसानीची माहिती देत नुकसानग्रस्त

शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून वेळीच सावरण्याची गरज असल्याचेही आ. रत्नाकर गुट्टे यांनी आवर्जून सांगितले. परभणी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांची खरीपाची पेरणी झालेली आसून अतिवृष्टी

झाल्याने शेतकऱ्यांच्या कापूस, सोयाबीन, मूग उडीद, ज्वारी इत्यादी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कोरोना महामारीमुळे परेशान असलेला जगाचा पोशिंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे अधिकच हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांना वेळीच सावरणे

अत्यंत गरजेचे असल्याने अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
यावेळी गंगाखेड चे प्रभारी मा.सरपंच श्री हनुमंत मुंडे व बडवणीचे सरपंच श्री संभुदेव मुंडे उपस्थित होते.

Share now