आमदार.सुरेशराव वरपुडकर प्रयत्नाने पुरामध्ये एका मुस्लिम युवक मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना 4. लाखांची आर्थिक मदत
सुरेशराव वरपुडकर प्रयत्नाने पुरामध्ये मृत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत
सोनपेठ येथील सोनपेठ शहरातील रहिवासी शेख अलीम बडेमिया भाई यांचा मुलगा रेहान याचा वान नदीला आलेल्या पुरामध्ये मृत्यू झाला होता. आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या शासनाला पाठपुराव्याने सदर मृत मुलाच्या कुटुंबीयांना 4 लक्ष रुपये आर्थिक मदत शासनाकडून मिळवून देण्यात आली. सदर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने या शासकीय मदतीने त्यांना आधार मिळाला.

या मदतीच्या रकमेचा धनादेश सोनपेठ तालुक्याचे तहसीलदार हस्ते मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आला.यावेळी सौ.प्रेरणा वरपुडकर, युवानेते सुमित भैय्या पवार, तालुकाध्यक्ष मुंजाभाऊ धोंडगे, गरदेवाडीचे सरपंच सुशांत भैय्या पवार, डिघोळचे उपसरपंच अजय भैया देशमुख, राजू सौदागर, जगन्नाथ कोलते, सचिन जगदाळे, गौस खुरेशी, संतोष परांडे, साजेद खुरेशी, युसुफ पठाण, प्रशांत वानकर उपस्थित होते.