ताज्या घडामोडीमनोरंजन

आ.बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठान च्या वतीने शहरातील महिलांना 100 शिलाई मशीन व 50 पिठाच्या गिरणी वाटप

संपादक अहमद अन्सारी. पाथरी येथील दिनांक 24 सप्टेंबर रोजी विधान परिषद सदस्य आमदार बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठान च्या वतीने शहरातील गरजू लाभार्थी महिलांना 100 शिलाई मशीन व 50 पिठाच्या गिरणी वाटप कार्यक्रमाचा भव्यदिव्य सोहळा मा. ना. राजेश भैया टोपे आरोग्य मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली हुले कॉम्प्लेक्स, सेलू कॉर्नर पाथरी येथे संपन्न झाला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक पाथरी शहराचे युवा नेते मा. जुनेद भैया दुर्राणी यांनी केले. आपल्या खास शैलीत जुनेद भैया यांनी पाथरी नगर पालिकेचा विकास व आ. बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठान चे कार्य मा.राजेश भैया टोपे यांच्यासमोर मांडले. यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात राजेश भैया टोपे यांनी, शिलाई मशीन वाटप व पिठाची गिरणी वाटप हा आ. बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठान च्या वतीने होत असलेल्या कार्यक्रमाची प्रशंसा केली तसेच

आ. बाबाजानी दुर्राणी साहेब यांनी आजपावेतो केलेल्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. आ. बाबाजानी साहेब यांनी मंत्रिपद मिळावे म्हणून निश्चित प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच पाथरी नगर पालिका आ. बाबाजानी साहेब यांच्या नेतृत्वाखाली यावेळी बिनविरोध करून इतिहास घडवा, असेही ते यावेळी म्हणाले. सदरील कार्यक्रमासाठी कार्यसम्राट आ. बाबाजानी दुर्राणी साहेब, माजी खासदार श्री. जयसिंगराव गायकवाड,

श्री. मुंजाजीराव भालेपाटील, श्री. किरण सोनटक्के सर, श्री. मुजाहेद खान साहेब, श्री. तबरेज दादा दुर्राणी, गट नेते श्री. जुनेद भैया दुर्राणी, श्री. तारेख भैया दुर्राणी, नगराध्यक्षा सौ. मीनाताई भोरे, उपाध्यक्ष श्री. हन्नान खान दुर्राणी यांसह इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आ. बाबाजानी दुर्राणी सेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री. नासिरुद्दीन सिद्धीकी,

उपाध्यक्ष श्री. अलोक चौधरी, सचिव श्री. नितेश भोरे यांसह सर्व सन्माननीय नगरसेवक, नगर परिषद पाथरी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री.चव्हाण यांनी केले. कार्यक्रमासाठी मोठया संख्येने लाभार्थी, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Share now