एक कोटी ५ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आ.नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न
अंबड शहरात १ कोटी ५ लक्ष रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन आ.नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न.
अंबड प्रतिनिधी :- शहराच्या विकासासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री मा.ना.श्री रावसाहेब दानवे व आमदार नारायण कुचे यांच्या विशेष प्रयत्नातून अंबड नगर परिषद अंतर्गत डॉक्टर ढेंबरे यांच्या घरापासून ते वडगावकर हॉस्पिटल पर्यंत भुयारी नाली बांधकाम, जालना बीड रोडवरील आय सी आय सी आय बॅंक ते
पंचायत समिती कार्यालया पर्यंत आर सी सी नाला बांधकाम करणे, महाराष्ट्र द्वार पासुन ते महात्मा फुले चौक पर्यंत आर सी सी रस्ता बांधकाम करणे,प्रभाग क्रमांक २ चांगले नगर मध्ये विजू जळके यांच्या घरापासून ते हारुन भाई च्या गॅरेज पर्यंत रस्त्याचे मजबुतीकरण करणे असे एकूण १ कोटी ५ लक्ष रुपयांच्या कामाचे भूमिपूजन सोहळा आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी माजी आमदार विलास बापू खरात, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपक भैय्या ठाकुर,कृषी उत्पन्न
बाजार समिती सभापती अवधूत नाना खडके, औदुंबर बागडे,अरुण भाऊ उपाध्ये,फेरोज शेख, विठ्ठलसिंह राणा, द्वारकादास जाधव, केदार सेठ राठी, बाबुराव खरात,राजू दादा सावंत, संजय राठोड, श्रीमंत खरात, बाबासाहेब भोजने,ओम सेठ उबाळे, बाळासाहेब तायडे,नसीर बागवान, लक्ष्मण पेदे, रमेश शहाणे, लक्ष्मण राक्षे,बाबा सोळुंके,ओम दादा वाघुंडे, लक्ष्मण गायके, धर्मराज बाबर,डहाळे शेठ, सौरभ कुलकर्णी,बाळू खरात, सुरेश गुडे, सुनील बिडे, संदीप खरात,बाळू शहाणे, सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.