आम मुद्देताज्या घडामोडी

एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्र दत्तोबा भक्तांसाठी वरदान ठरेल

एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्र दत्तोबा भक्तांसाठी वरदान ठरेल- ह भ प रोहिदास महाराज मस्के

गंगाखेड/ प्रतिनिधी एरवी आजारी पडल्यानंतर रुग्णांना स्वतःहून दवाखान्यात जावं लागतं. एक दिवशीय आरोग्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून दत्तोबा संस्थानात मिळणारी ही आरोग्यसेवा भक्तांसाठी वरदान ठरेल असा विश्वास रामायणाचार्य हभप रोहिदास महाराज मस्के यांनी गुरुवारी बोलताना व्यक्त केला. ते महातपुरी जिल्हा परिषद अंतर्गत

येत असलेल्या दत्तवाडी येथील दत्तोबा संस्थानात एक दिवशीय शासकीय आरोग्य सुविधा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक दरेकर मामा हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तालुका आरोग्य अधिकारी डॉ.यु बि. बिराजदार वैद्यकीय अधिकारी डॉ. ठुले मॅडम, वाघलगाव चे माजी सरपंच नारायणराव धनवटे, महातपुरी ग्राम शिक्षण समितीचे अध्यक्ष जानकीराम

वाळवटे, पडेगावचे चेअरमन मारोतराव निरस आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित डॉक्टर सह, आरोग्य कर्मचारी गायकवाड सर(mpw),वाळके सर(Deo), कांगने सिस्टर(anm),कौसर सिस्टर(anm), स्वामी मॅडम(गट प्रवर्तक), आशा कदम(आशाताई),सौ.राठोड(आशाताi)धोंडाबाई ब्रिनगणे यांचे सह ही आरोग्य सुविधा केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घेणारे आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ बिराजदार म्हणाले की आरोग्य सुविधा पुरवणे आमचे

कर्तव्य असले तरी दत्तोबा संस्थान सारखे दळणवळणाच्या सुविधा नसलेल्या भागात या दर गुरुवारी सुरू राहणार असलेल्या एकदिवशीय आरोग्य सुविधा केंद्र च्या माध्यमातून या भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. या सुविधाचा केंद्र परिसरातील रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. ग्रामस्थांनी जागा उपलब्ध करून दिल्यास या ठिकाणी आरोग्य उपकेंद्र इमारत बांधकामासाठी प्रस्ताव

पाठवण्याची आश्वासनही त्यांनी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तंटामुक्त समितीचे अध्यक्ष माधवराव दरेकर यांनी केले. दत्तोबा संस्थानचे मठाधिपती नागनाथ महाराज पुरी व शंकरवाडी, दत्तवाडी, दत्तवाडी तांडा, गोविंदवाडी ,पडेगाव, बनपिपळा येथील ग्रामस्थांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. कार्यक्रमांत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Share now