ताज्या घडामोडीमनोरंजन

एमटीएस व एनएमएमएस परीक्षेत श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयाचे यश

संपादक अहमद अन्सारी. माजलगाव- शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये संपन्न झालेल्या एमटीएस परीक्षेत श्री सिध्देश्वर माध्यमिक विद्यालयातील १६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून जिल्हा स्तरावरील शिष्यवृत्तीस कु जोशी मधूरा शंकरराव ही पात्र ठरली असून जिल्ह्यातून पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर तालुका स्तरावरील पारितोषिक चि गवते वेदांत श्रीकिसन, कु जोशी अपुर्वा अमोल, चि लड्डा कौस्तुभ कमलकिशोर या विद्यार्थ्यांना मिळाले आहे. तर

कॉन्सोलेशन प्राईज कु जोशी सानिका मुकुंद, चि शेख आदिल अनिस तसेच १० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. तसेच एन एम एम एस परीक्षेत विद्यालयातील २९ पैकी १७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून कु शर्मा श्रध्दा रामेश्वर हिने १२१ गुण घेऊन प्रथम व कु वानखेडे उत्कर्षा चंद्रकांत हिने ११० गुण घेऊन द्वितीय तर कु पेकम सानिका हनुमंत हिने ९८ गुण घेऊन तृतीय क्रमांक पटकावला आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेंद्र आलुरकर, उपाध्यक्ष राधेश्याम लोहिया, कार्यवाह नितीन शेटे,सहकार्यवाह प्रा चंद्रकांत मुळे,डॉ हेमंत वैद्य,सौ कल्पना

चौसाळकर,श्री सिध्देश्वर शैक्षणिक संकुलाचे पालक सुनील लोढा, अध्यक्ष प्रकाश दुगड, कार्यवाह अमरनाथ खुर्पे,शालेय समितीचे अध्यक्ष प्रेमकिशोर मानधने शाळेचे मुख्याध्यापक बाबुराव आडे गुरुजी,उपमुख्याध्यापक विजयेंद्र चौधरी सर,पर्यवेक्षक उमेश थाटकर सर, मिलिंद वेडे सर,रविंद्र खोडवे सर आदिंनी अभिनंदन केले आहे, या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना अतुल मुगळीकर, राहुल नेटके, लक्ष्मीकांत बुगदेे, राहुल नाईक, तांत्रिक मार्गदर्शन मुकेश काळे यांनी केले आहे

Share now