करोना काळात बंद असलेल्या बसेस चालु करा आ .कुंचे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली मागणी
वयोवृद्ध प्रवासी भाविक भक्त विद्यार्थी व त्रस्त प्रवाशांची आ .कुंचे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली मागणी
बदनापूर प्रतिनिधी:अंबड तालुक्यातील व बदनापुर तालुक्यातील लोणार भायगाव, कीनगावचौफुली ,जामखेड ,नानेगाव, रोषणगाव ,धोपटेश्वर मार्गाने चालणार्या बसेस कोरोना काळात बंद केल्या होत्या .त्या बसेस अद्याप चालू केल्या नाही जवळपास जालना आगारा ने इतर मार्गावर बसेस चालु केल्या आहे.

परंतु विभागीय नियंत्रक अधिकारी च्यां मनमानी कारभार मुळे जालना ते पाचोड सकाळी ८:०० वा व जालना ते चिकनगाव मुक्कामीजालना ते पैठणतसेच अंबड आगाराच्या अंबड ते बदनापुर सकाळी ८:३०, २:०० व मुकाम्मी ६:००वाजता च्या बसेस पाच सहा वर्षा पासुन बंद केल्या आहेत. विभागीय नियंत्रक अधिकारी यांना वांरवार निवेदन दिले आपण हि यापुर्वी पत्र दिले होते परंतू विभागीय नियंत्रक अधिकारी यांनी कोणतीही दखल घेतली नाही.या निवेदनावर नामदेव माने, जगन्नाथ दसपुते ,मारोतराव जाधव ,कुंडलीक मुंजाळ ,योगेश बुंनगे सह आनेक वयोवृद्ध प्रवासी भाविक भक्त विद्यार्थी वर्गाच्या सह्या आहे.