आम मुद्देताज्या घडामोडी

खासदार फौजीयाजी खान यांची चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयास सदिच्छा भेट

नायगाव प्रतिनिधी-राज्यसभेच्या खासदार तथा वक्फ बोर्डाच्या सदस्या मा फौजिया खान यांनी नायगाव येथून धावत्या दौऱ्यामधून आपला अमूल्य वेळ देऊन नायगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील चव्हाण यांच्या संपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. तेंव्हा नायगाव शहरातील वक्फ-बोर्डाची दर्गा तवक्कलशहा वल्लीची खिदमत मास जमीन मालमत्ता /गट क्रमांक 448, 449, 450 मधील जमीन येथील राजकीय सत्ताधाऱ्यांनी बळकवण्याचा

प्रयत्न केला परंतु येथील काही सुजाण नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह दर्गा मुत्तावल्लीच्या वंशजांनी राज्यकर्त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी केला आणि वक्फ बोर्ड औरंगाबाद येथे धाव घेऊन तक्रार दिली आणि यापूर्वी ही खासदार मा. फौजिया खान मॅडम यांना निवेदन दिले. त्या अनुषंगाने आज रोजी खासदार फौजिया खान यांनी नायगाव येथील वक्फ बोर्डाच्या जमिनीची पाहणी करून

सदरील प्रकरणाची माहिती घेतली त्या प्रसंगी उपस्थित मा. यशपाल भिंगे, मा.भास्कर भिलवंडे, देवीदास बोमनाळे, सामाजिक कार्यकर्ते भाऊ पाटील चव्हाण, रघुनाथ सोनकांबळे, गंगाधर पा. कल्याण, श्याम चोंडे, गजानन पा. चव्हाण, विठ्ठल पा. गवळी, कैलास भालेराव, जुनैद पठाण, बाबू भूकमारीकर, करीम चाऊस, शेख आझम,दर्गा मुत्तवल्लीे वंशज शेख बाबू जलालसाब,शेख ताहेर,शेख इसाक,शेख इद्रीस,सय्यद अली बाबूसाब आणि मुस्लिम समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share now