ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन

मंठा प्रतिनिधी :- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांना शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासंदर्भात प्रश्न विचारला असता ते चक्क थुंकल्याची घटना घडली. शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांना विविध प्रश्न विचारले.

या दरम्यान काही पत्रकारांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वक्तव्याचा हवाला देत केलेल्या प्रश्नाला उत्तर न देता राऊत थुंकणे. भर पत्रकार परिषदेत वाहिन्यांच्या कॅमेऱ्यासमोर राऊत यांनी ही कृती केली.खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या परदेश दौऱ्यावर टीका केली होती.

उष्णता सहन होत नसल्याने ते परदेशात गेले असतील, या त्यांच्या वक्तव्याबाबत राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. राऊत यांनी हा प्रश्न ऐकल्यानंतर असे कोण म्हणाले, असा प्रतिप्रश्न केला. त्यावर, पत्रकारांनी श्रीकांत शिंदे यांचे नाव घेताच उत्तर देण्याऐवजी राऊत यांनी थुंकण्याची कृती केली. त्यांच्या या कृतीने आता शिवसेना आणि भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असताना मंठा येथे जोडेमारो आंदोलन करण्यात आले.संजय राऊत यांनी घृणास्पद वागणुकीतून आता सर्व मर्यादा आता

ओलांडल्या आहेत. त्यांचे संवाद हे राजकीय विरोधकांमध्ये द्वेषाने भरलेले आहेत आणि महाराष्ट्राची संस्कृती सार्वजनिकरित्या दुषित करणारे आहेत.खा.श्रीकांत शिंदे यांच्या विरुद्धच्या घृणास्पद वक्तव्याचा मंठा येथे निषेध करण्यात आला.यावेळी माध्यमांशी बोलताना तालुका प्रमुख उदयसिंह बोराडे म्हणाले की, पवार आणि ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने राऊत यांचे मानसिक संतुलन ढासळल्याने ही समजते. त्यांनी आता मानसिक रुग्णालयात चांगले आणि योग्य उपचार घ्यावेत.

आम्ही त्यांना मदत करू शकतो’, असे प्रत्युत्तर मंठा शिवसेनेकडून देण्यात आले. यावेळी उपस्थित चांद पठाण,विलास राठोड,अर्जुन राठोड, बापूराव वरकड, गणेश चव्हाण,बाळासाहेब घोरसड, शिवराज घोरसड, सिद्धू जाधव, पवन खरात, गजानन खरात, गणेश बोराडे ,रामदास वायळ, माऊली वायाळ, उमेश राठोड वेदांत खरात रामराव वरकड रितेश खरात महेश देशमुख अंगद मोरे विनोद खरात अलीम कुरेशी सईद रहीम व अनेक शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

Share now