क्राईमताज्या घडामोडी

गंगाखेड परळी रोडवर भीषण अपघात 25 ते 30 प्रवासी गंभीर जखमी

गंगाखेड परळी रोडवरील करम पाठीवर बस ट्रॅव्हल्स अपघात झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी असल्याची माहिती दिली .तात्काळ स्कुटीवर बसून गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. प्रवेशद्वारावर गेलो असता जिकडे तिकडे जखमींना पाहण्यासाठी भेटण्यासाठी आलेले बघे , नातेवाईक यांची गर्दी दिसून आली. जो तो आपापल्या परीने वाहनातून येणाऱ्या जखमींना उतरून घेत दवाखान्यातील उपचाराच्या रूममध्ये घेऊन जात होता. हे दृश्य मनाचा थरकाप उडवणार होतं.

नक्कीच दोन-चार तरी गेले असतील तर मनात वाटत होतं. जखमींना मदत करणाऱ्या अनोळखी लोकांसोबत पण वाहनातून आणलेल्या जखमींना आत नेण्यासाठी प्रयत्न करत होतो. उपचाराच्या ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी बाहेर पेक्षा जास्त गर्दी दिसून आली .डॉक्टर, आरोग्य सेविका ,आरोग्य सहकारी, शिपाई प्रत्येक जण आपापल्या परीने धावपळ करत होता. आणि या जखमीचे प्राण कसे वाचतील यासाठी

प्रयत्न करत होता. गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य कर्मचारी चे प्रयत्न अपुरे पडत होते. या ठिकाणी जास्तीत जास्त डॉक्टर आरोग्य कर्मचारी उपस्थित असतील तर या जखमीवर उपचार करणे सोपे जाईल उपचार लवकर मिळतील. या हेतूने उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील साहेब यांना फोन करण्याचा प्रयत्न केला पण ते फोन उचलू शकले नाहीत. तहसीलदार येरमे साहेब यांनी फोन उचलला नाही .

त्यानंतर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनाही कॉल केला, sms केला तरी त्यांनी कॉल उचलला नाही= जिल्हाधिकारी मॅडमचे पीए मठपती साहेब यांना कॉल करताच त्यांनी उचलला आणि मग सूत्रे हलली.या सर्व घटनेची माहिती मठपती साहेबांना दिली. त्यांनी तात्काळ सीएस नागरगोजे आणि एचडीओ साहेबांना कळवतो असे सांगितले. त्यानंतर आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक नागरगोजे यांना कॉल करण्याचा प्रयत्न केला.

त्यांनी पण फोन उचलला नाही. जिल्हाआरोग्य अधिकारी डॉक्टर गीते त्यांना कॉल केला त्यांनी तात्काळ फोन उचलून आमचे म्हणणे ऐकून घेतले .या ठिकाणची आरोग्य यंत्रणा अपुरी पडत असून ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा या ठिकाणी पाठवावी अशी विनंती डॉक्टर गीते साहेबांना केली. उपजिल्हा रुग्णालयाचे प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर हेमंत मुंडे साहेब यांच्याशी संपर्क साधला असता मी बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पत्रकार बाळासाहेब जंगले, अनिल शेटे,

राजकुमार मुंडे ,पिराजी कांबळे, मोहसीन खान आदींनी वृत्त संकलन सोबतच जखमी उपचार मिळण्या ण्यासाठी प्रयत्न केले. सामाजिक कार्यकर्ते इंतजार सिद्दिकी, रामेश्वर बचाटे जखमींना उपचार मिळवून देण्यासाठी धडपड करत होती. पोलीस उपाधीक्षक लोढा साहेब यांनी जखमींची भेट घेत विचारपूस केली. या जखमींना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या डॉक्टर चट्टे, मूलुरवार , जगतकर इतर डॉक्टर, कर्मचारी शफी,

भीमा राठोड व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी रुग्णवाहिका चालक या सर्वांचे करावे तेवढे कौतुक खरोखरच कमी आहे. जखमींना उपचार मिळवून देण्यासाठी मी खारीचा वाटा उचलू शकतो याचे समाधान वाटते.
संबंधित अधिकाऱ्यांना केलेल्या कॉल च्या रेकॉर्डिंग याच पेजवर पुढच्या बातमीत ऐकायला मिळतील)
अपघातग्रस्त बस व ट्रॅव्हल्स चे वाहनाचे फोटो फार भयानक आहेत म्हणून टाकले नाहीत

Share now