आम मुद्देताज्या घडामोडी

गुतेदारास कामाच्या नाव फलकाची अलर्जी का. व उपोषणाचा पाचवा दिवस

संपादक अहमद अन्सारी. पुर्णा नगर परिषदेने चार ठिकाणी एक कोटी रुपयांचे नाली व रोडकामे केली. सदर बांधकामाच्या ठिकाणी शासन मान्यते प्रमाणे नामफलक बोर्ड लावन्यात यावेत या प्रमुख मागणीसाठी. अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार विरोधी समितीचे पुर्णा तालुका अध्यक्ष तथा पत्रकार मारोतीराव ढाले यांनी नगर परिषद कार्यालया समोर दिनांक 07/09/2022 पासुन उपोषणास प्रारंभ केले आहे.

आज उपोषणाचा पाचवा दिवस असुन उपोषणकर्त्याची प्रकृती गंभीर असतानाही प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेत आहे उपोषण कर्त्याच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहे जर तात्काळ दखल नाही घेतल्यास पूर्ण महाराष्ट्रात अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे पदाधिकारी रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार आहेत.

पूर्णा नगर परिषद प्रशासनाने एक ठिकाणी 25 लाख रुपयाचे तर दुसऱ्या ठिकाणी 20 लाखाचे आरसीसी नाली व सीसी रोडचे काम केले आहे व एक ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे 30 लाख रुपयाचे काम असे चार ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत एक कोटी रुपयाचे कामे अंदाज पत्रकाच्या विशिष्ट मापदंडानुसार न करता अत्यंत निकृष्ट दर्जाची कामे करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी मेहरबाण तो क्या करे मलाई मेहमान अशा म्हणी प्रमाणे भ्रष्टाचारास अभियंता व मुख्यधिकारी मुक समंती देत आहेत. परंतु अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने केवळ बांधकाम झालेल्या ठिकाणी शासनाच्या नियमावली प्रमाणे नाम फलक लावण्याची मागणी केली आहे परंतु भ्रष्टाचारी गुतेदारास कामाच्या नाम फलकाची अलर्जी आहे की काय?

नाम फलक लावत नसल्याने अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात आले आहे. आज उपोषणाचे पाचवे दिवस असतानाही उपोषण कर्त्याच्या मागण्याकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्या मागे दडले तरी काय अद्याप कळेनासे झाले आहे या गंभीर बाबीकडे नगरपरिषद मुख्याधिकारी, नगरपरिषद प्रशासक सुधीर पाटील व परभणीचे जिल्हाधिकारी लक्ष न देण्यामागे काही तरी फार मोठा भ्रष्टाचार लपल्याची शक्यता नाकारता येत नाही.

उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे तात्काळ दाखल न घेतल्यास अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रातील संघटनेचे पदाधिकारी सोमवारपासून रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन करणार व पूर्णा येथील महिला पदाधिकाऱ्यांच्या वतीने नगरपरिषदेला बांगड्याचा आहेर देणार अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांनी दिली.

या उपोषणात पुर्णा तालुका अध्यक्ष मारोतराव ढाले, शहराध्यक्ष विजय उमप, महिला जिल्हाध्यक्षा निकिता खरे, महिला जिल्हा सचिव शोभाताई डोंगरे, शहराध्यक्षा उषाताई साळवे, तालुकाध्यक्षा शोभाताई लोखंडे, महिला शहराध्यक्षा सुचिता साळवे, महिला शहर सचिव मीनाताई चोपडे व इतर पदाधिकारी हा उपोषण यशस्वी करण्यासाठी प्रयत्नात आहेत.

Share now