क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने घर जळाले. उघड्यावर आलेल्या कुटुंबासाठी मदतीचे आवाहन

सामाजिक कार्यकर्ते बोबडे ,भोसले यांनी घेतली भेट

गंगाखेड प्रतिनिधी. गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन अख्ख घर जळून गेलं .उघड्यावर आलेल्या धनगर मोहा येतील तरडे कुटुंबाच्या मदतीसाठी सामाजिक कार्यकर्ते सखाराम बोबडे पडेगावकर, रामेश्वर भोसले पाटील यांनी गुरुवारी घटनास्थळी भेट देत मदतीच आवाहन केलं.

धनगरमोहा येथील अवघी एक एकर शेती असलेला अल्पभूधारक शेतकरी पाराजी तरडे याचं राहतं घर गॅस सिलेंडरच्या स्फोटाने जळून गेलं. पंधरा बाय दहाची असलेली एकमेव खोली असलेल्या संसाराची राख रांगोळी झाली. सुदैवाने घरातील सर्व सदस्य शेताकडे व तालुक्याच्या ठिकाणी गेल्यामुळे जीवितहानी टाळली. पण आज अन्नधान्य, भांडीकुंडी, कपडे सर्व जळून गेल्यामुळे त्यांच्यासमोर अत्यावश्यक गरजा भागवण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

माहिती मिळताच आम आदमी पार्टीचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले, खादगावचे राहुल फड यांनी घटनास्थळी जाऊन तरडे व यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पाराजी यांच्या आईने कुटुंबावर आलेल्या संकटाचे माहिती देत असताना उपस्थितांचे डोळेही पानावले. एकूणच या पाराजी तरडे या कुटुंबाला समाजातील दानशूरानी अन्नधान्य ,भांडीकुंडी, कपडे आधी जी घडल ती मदत करावी

असं आवाहनही या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली. घटना घडली त्याच दिवशी या सामाजिक कार्यकर्त्यांनी गॅस एजन्सी व तहसील कार्यालयास ही माहिती कळवत तात्काळ पंचनामेसाठी पाठपुरावा केला होता. पाराजी तरडे यांचा 8975148355 हा नंबर असून दानशूरानी संपर्क साधावा.

Share now