क्राईमताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

गॅस सिलेंडरच्या स्फोटाने उघड्यावर पडलेल्या तरडे कुटुंबाला घरकुल द्या. सखाराम बोबडे पडेगावकर

गंगाखेड प्रतिनिधी सुमारे एक महिन्यापूर्वी गॅस सिलेंडरच्या स्फोटाने उघड्यावर पडलेल्या धनगरमोहा येथील तरडे कुटुंबाला पंचायत समितीच्या वतीने तात्काळ घरकुल देण्याची मागणी सखाराम बोबडे पडेगावकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने गुरुवारी पंचायत समिती कार्यालयाकडे केली.पाराजी तरडे यांचे घर एक महिन्यापूर्वी या सिलेंडरचा स्फोट झाल्याने जळून गेले. घरात एक वस्तूही शिल्लक राहिली नाही

.घटना घडताच आम आदमीचे पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे रामेश्वर भोसले पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तरडे कुटुंबाची भेट घेत मदतीची आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातून या कुटुंबास वेगवेगळ्या पद्धतीने मदत झाली. काहीनि त्यांनी कपडे ,अन्नधान्य रोख पैसे दिले. इरलद शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी राठोड यांनी मुलांसाठी शालेय साहित्यही दिले. गॅस एजन्सीकडे पाठपुरावा करून गॅस सिलेंडर

शेगडी या कुटुंबास मिळवून दिली. आज पंचायत समिती कार्यालयाकडे जाऊन या कुटुंबास तात्काळ घरकुल द्यावे अशी मागणी दुसऱ्यांदा केली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गंगाखेड विधानसभा प्रमुख जयवंत कुंडगीर, हरंगुळ चे चेअरमन बीबन पठाण, स्वाभिमानीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब टेकाळे, ज्येष्ठ नेते विक्रम बाबा इमडे, स्वतः अर्जदार पाराजी तरडे उपस्थित होते. पंचायत समिती प्रशासनाने या अर्जाची तात्काळ दखल घेऊन या कुटुंबास घरकुल मंजूर करत करत बांधकाम सुरू करण्याचेही आश्वासन दिले.

Share now