ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

घनसावंगी पंचायत समितीत कर्मचारी नेहमीच गायब,

पंचनामा ही करत नाहीत तहसीलदार साहेब.

जालना प्रतिनिधी :- स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लांबल्याने सध्या पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचारी यांची मनमानी वाढल्याच्या तक्रारी येताना दिसत असून घनसावंगी पंचायत समिती मध्ये सध्या गटविकास अधिकारी यांच्यासह बरेच कर्मचारी रजा नसताना गैरहजर असतात.व दुसऱ्यादिवशी येऊन आपली रजिष्टर वर सही मारतात

त्याचाच प्रत्यय विष्णू अण्णा माकोडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष जालना यांना 8 जून रोजी आला.ते काही कामानिमित्य घनसावंगी पंचायत समिती येथे गेले असता तेथे त्यांना फक्त तीन कर्मचारी हजर असल्याचे आढळून आले.त्यामुळे त्यांनी पंचायत समिती कर्मचारी गैरहजर असल्यामुळे तसा पंचनामा करण्यासाठी घनसावंगी तहसीलचे नायब तहसीलदार यांना संपर्क केला असता नायब तहसीलदार यांनी पंचनामा करण्यास नकार देत ते आमच्या अधिकारात येत नाही आम्हाला लोक उद्या कोर्टात नेतात आमच्यावर खटले दाखल करतात

असे सांगून वेळ मारून नेण्याचे काम केले त्यावेळी मी तसा जीआर आम्हाला दाखवा तसा जीआर कोठे च नाही त्यामुळे अशी बेजबाबदार व बेकायदेशीर विधान करून त्यांनी माझा व कायद्याचा अपमान केला आहे त्यामुळे संबंधित प्रकरणाची योग्य ती चौकशी होऊन संबंधीतांवर कारवाई व्हावी अन्यथा मनसे स्टाईल आंदोलन करण्यात येईल असा इशारा विष्णू अण्णा माकोडे मनसे जिल्हा उपाध्यक्ष जालना यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली .

Share now