क्राईम

घरकुलाच्या नावाखाली धनजला गोदावरी पत्रात वाळू उत्खानन

नांदेड जिल्हा प्रतिनिधी.नायगांव तालुक्यातील धनज येथील काही नागरिक घरकुलाच्या नावाखाली गोदावरी नदी पत्रात मंडळ अधिकारी, तलाठी व राहेर पोलीस चौकीच्या आशीर्वादाने भरदिवसा बेकायदेशीर उत्खानन करून गाढवांच्या सह्याने गावात वाळूसाठवून त्याची रात्रीला विल्हेवाट लावत आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार यांना कळताच त्यांनी धनज येथील वाळू चोरांवर दंडात्मक कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले.

नायगांव तहसील आंतर्गत असलेल्या कुंटूर मंडळाचे मंडळ अधिकारी व धनजचे तलाठी हे धनज येथील वाळू चोराट्याशी सांगनमत करून गावात घरकुलाला वाळू पाहिजे म्हणून तहसीलचे कुठलेही आदेश किंवा पावती न घेता दोन ब्रास वाळू वाटप करणारी कुठलीच यंत्रणा धनज गावात नसतांना,नदी पत्रात वाळू उत्खानन करून गाढवाच्या सह्याने गोदावरी नदीतून धनज गावात आणून घराच्या आसपास साठवून त्याची पुन्हा रात्रीला गावातील ट्रॅक्टरणे वाहतूक करून विक्री करीत आहेत. यासर्व कारभाराला कुंटूर मंडळातील महसूल कर्मचाऱ्यांसह कुंटूर ठाण्याच्या राहेर पोलीस चौकीचेही पाठबळ असल्याचे सांगितले जाते.

दिनांक 3 जून रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास काही पत्रकार व कार्यकर्ते धनंजला गेले होते तेथे गोदावरी नदीपत्रातील वाळू उत्खानन पाहून आवक झाले शंभर आसपास गाढवांवर नदी पत्रातील वाळू दिवसांढवळ्या गावात आणून साठवणूक केली जात असल्याचे पहिले, चौकशी केली असता त्यांना उद्धट पणाने घराकुलाला वाळू आणली आहे असे सांगितले. वास्तविक धनज गावासाठी वाळू वाटपाचा कुठलाही आदेश सध्या तरी नसल्याचे कळले पण आहे असे समजले तर घरकुलासाठी दोन ब्रास वाळू मोजून देणारी कुठलीच यंत्रणा धनजला आढळून आली नाही.

मंडळ अधिकारी व पोलीस चौकीची साथ असल्यामुळे त्याच्या पाठबळावर वाळूची छायाचित्र काढणाऱ्या पत्रकारांचे मोबाईल हिसाकावून मोटार सायकलची चावीही काढून घेतली. वाळू चोरांनी फोटो काढून टाकण्यासाठी त्याच्याशी हुजत घातली. मात्र गावातील काही समजदार युवकांनी प्रकरण अंगलट येणार हे समजून मोबाईल व मोटार सायकलची चावी वापस केली.

घरकुलाच्या नावाखाली धनज येथे होणारी वाळू चोरी व त्याला आशीर्वाद असलेल्या महसूल कर्मचाऱ्यांनावरही दंडात्मक कार्यवाही व्हावी आशी मागणी होत असून धनज येथील गाढवाच्या सह्याने वाळू उत्खानन होत असलेली घटना कळताच नायगावचे तहसीलदार गजानन शिंदे यांनी त्याच मंडळ अधिकाऱ्यांना पंचनामा करून अहवाल सादर करण्यास सांगिलले. गावभर अनेकांच्या घरी वाळू असल्याने अजून कर्मचारी वाढवून पाचनामे करणे आवश्यक असून पंचनामे होणार म्हणून रात्रीला वाळूला पाय फाटणार नाहीत याची काळजी महसूल आणि पोलीस विभागाने घेणे आवश्यक आहे.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर जाहिरात साठी व बातमी साठी संपर्क साधावा मोबाईल नबरः 9960484886

Share now