घरोघरी तिरंगा चित्ररथाला औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
घरोघरी तिरंगा चित्ररथालाजिल्हाधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत घरोघरी तिरंगा अभियाना बाबत जिल्हा भरात जनजागृती व्हावी या उद्देशाने जिल्हा माहिती कार्यालयाने चित्ररथाची निर्मिती केली आहे.

चित्ररथाच्या माध्यमातून मतदार आधार प्रमाणिकरण कार्यक्रम आणि कोविड लसीकरण अमृत महोत्सवाची देखील जनजागृती करण्यात येणार आहे. या चित्ररथाला जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज हिरवी झेंडी दाखवली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात हा कार्यक्रम पार पडला. अपर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, जिल्हा माहिती अधिकारी मुकुंद चिलवंत आदी उपस्थित होते. चित्ररथाच्या माध्यमातून

मोठ्याप्रमाणात जागृती निर्माण करावी. आझादी का अमृत महोत्सव उपक्रमांतर्गत प्रत्येकाने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरावर राष्ट्रध्वज फडकवावा. हे करत असताना सर्वांनी ध्वज संहितेचे पालन करावे. यासह मतदार ओळखपत्र आधार कार्डला संलग्न करा. 15 जुलै ते 30

सप्टेंबर या कालावधीत 18 वर्षांवरील सर्वांना मोफत कोविड लसीकरणांतर्गत बुस्टर डोस देऊन कोविड लसीकरण अमृत महोत्सव साजरा होत असल्याबाबत जागृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केले.