ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

जमात-ए-इस्लामी हिंद नेर च्या वतीने मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न.

मोफत नेत्र तपासणी व रक्तदान शिबीर संपन्न

जालना प्रतिनिधी :- ज्याने कोणाला जीवन दान दिले त्याने जणु काही सर्व मानव जीवन प्रदान केले नेर येथील जमात-ए-इस्लामी हिंद शाखेच्या वतीने मोफत नेत्र तपासणी व औषधी आणि रक्तदान शिबिर संपन्न झाले.

या शिबिरात २७ रक्तदात्यांनी आपले अमुल्य रक्तदान केले.१२० गरजू नेत्र रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करून मोफत औषधी सुध्दा देण्यात आली या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिराला यशस्वी करण्यासाठी अमानुल्ला खान,अताउल्ला खान,शारेक खान यांनी परिश्रम घेतले जमात-ए-इस्लामी हिंद चे अध्याक्षांनी सर्व रुग्णांचे आभार व्यक्त केले.

Share now