जमियत ए उलमा हिंद अर्शद मदनी पदाधिकाऱ्यांचे संघटन बांधणी संदर्भात पाथरी येथे दौरा संपन्न
जमियत ए उलमा हिंद पधिकाऱ्यांचे संघटन बांधणी संदर्भात पाथरी येथे दौरा
संपादक अहमद अन्सारी. पाथरी येथील दिनांक 31 डिसेंबर 2021 रोजी जमियत ए उलमा हिंद चे मराठवाडा जनरल सेक्रेटरी खारी सय्यद अब्दुल रशिद हामिदी साहब व जिल्हा उपाध्यक्ष गुलाम रसूल साहब बयती तसेच जिल्हा उपाध्यक्ष शेख अय्युब भाई मिलन यांचे पाथरी येथे आगमन झाले असता, आलेल्या पदाधिकाऱ्यांचे विविध मशिदीमध्ये विशेष व्याख्यान (खुतबए जुमा) झालेतसेच शुक्रवारच्या नमाज पठण

नंतर जमियत ए उलमा हिंद चेसू जिल्हा उप अध्यक्ष खुर्शिद शेख यांच्या अध्यक्षते खाली व ईतर पदाधिकारी, कार्यकर्ते व समर्थ का सोबत एक विशेष बैठकीचे अयोजन करण्यात आले होते.या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन जमियत उलमा हिंद चे मराठवाडा जनरल सेक्रेटरी खारी सय्यद अब्दुल रशिद हामिदी साहेब यांनी केले, संघटन बांधनी संदर्भात
महत्वाची चर्चा करण्यात येऊन लवकरच पाथरी तालुक्याची एक सक्षम कार्यकारिणी जाहीर करण्या चे ठरले.पाथरी शहर वासीयांनी जमीयत ए उलमा हिंद संदर्भात उत्साह, प्रेम दाखवल्याबद्दल जमियत चे जिल्हा उपाध्यक्ष खुर्शिद शेख यांनी आभार मानले तसेच भविष्यात सदैव जमियत उलमा ए हिंद च्या हाकेला सदैव साथ राहिल असे उपस्थित समर्थकांनी व शहर वासियानी जाहिर केले.