ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोकराजकिय घडामोडी

जालना जिल्हा परिषदेत कोट्यवधीचा गैरव्याहर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर निलंबित

कोरोना महामारीच्या काळात औषधी खरेदीत जालना जिल्हा परिषदेत कोट्यवधीचा गैरव्याहर,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर निलंबित.

बदनापूर-अंबड मतदारसंघाचे आमदार.नारायण कुचे यांनी लक्षवेधी द्वारे जालना जिल्ह्यातील महत्त्वाच्या बाबीकडे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.श्री.तानाजी सावंत यांचे आणि सभागृहाचे लक्ष वेधले.जालना जालना जिल्हातील आरोग्य अधिकारी यांनी जागतिक कोरोना महामारीच्या काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे.

तसेच वरील अधिकारी यांना कोरोना काळात जागतिक आरोग्य संघटनेने किंवा शासनाने कोरोना प्रतिबंधात्मक औषधे व इतर उपकरणे याचा पुरवठा किंवा यांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार केला.असल्याचा निदर्शनास आले आहे.तसेच डॉक्टर खतगावकर या भ्रष्ट अधिकारी यांच्या भ्रष्टाचारीकर्त्यामुळे शासनाचा करोडो रुपयांच्या निधीचा चुराडा झाला असल्याचेही आमदार नारायण कुचे यांनी निदर्शनास आणून दिले.

तसेच वरील प्रकरणामुळे स्थानिक वर्तमानपत्र आणि विविध समाज माध्यमांमध्ये डॉक्टर खतगावकर यांचा भ्रष्टाचार उघड झाल्यामुळे जनमानसात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाल्याचे चित्र दिसून येत आहे.महिला डॉक्टर यांना त्रास देणे, वेळोवेळी तक्रारी करुनही वरील गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी न केल्याने आरोग्य अधिकारी डॉक्टर विवेक खतगावकर यांच्यावर कुठलेही कारवाई न झाल्यामुळे सामान्य जनतेत शासनाविरोधात तीव्र संतापाची लाट उसळी आहे.

असे लक्षवेधी द्वारे आमदार नारायण कुचे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री मा.ना.श्री तानाजी सावंत यांच्या लक्षात आणून दिले व डॉक्टर विवेक खतगावकर यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करुन उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.ना.श्री तानाजी सावंत यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विवेक खतगावकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

Share now