जिल्हातील बालकामगार आढळल्यास आस्थापना मालकांवर होणार कारवाई. टी. ई. कराड
परभणी जिल्हा प्रतिनिधी. परभणी, दिनांक .10. ऑगस्ट रोजी परभणी जिल्हातील पालकांनी अल्पशा मोबदल्यासाठी आपल्या पाल्याचे जीवन उध्दस्त करु नये, बालपण व शिक्षण हा प्रत्येक बालकाचा हक्क असून त्यापासुन त्यांना वंचित ठेवू नये. जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनात अथवा कोणत्याही व्यवसायात बालकामगार काम करताना आढळल्यास आस्थापना मालकावर दंडात्मक कारवाई व फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल.
असे निर्देश परभणी जिल्हेचे सरकारी कामगार अधिकारी तथा राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प समितीचे सचिव टी.ई.कराड यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व हॉटेल, विटभट्टी, दुकाने, गॅरेज, बेकऱ्या, कत्तलखाने व इतर छोट्या-मोठ्या उद्योगाच्या मालकांने 14 ते 18 वर्ष वयोगटातील किशोरवयीन बालकास धोकादायक व्यवसाय व प्रक्रियेमध्ये कामावर ठेवणे फौजदारी गुन्हा आहे. जिल्ह्यात कोठेही बालकामगार आढळुन आल्यास बाल व किशोरवयीन कामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारीत अधिनियम 2016 नूसार मालकास 6 महिने ते 2 वर्षापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार रुपये तर कमाल 50 हजार रुपयांपर्यंत दंडा अथवा दोन्ही शिक्षा मालकास होवू शकतात. असेही कळविले आहे.