आम मुद्देक्राईमताज्या घडामोडी

जिल्हा परीषद प्राथमिक शाळा ढालसखेडा येथील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न..

ढालसखेडा येथील शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुण गौरव सोहळा संपन्न..

अंबड प्रतिनिधी :- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या इ ५ वी शिष्यवृत्ती परीक्षेत जि.प.प्रा शा. ढालसखेडा शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठे घवघवीत यश मिळविले . ढालसखेडा शाळेतील सूरज राधाकिसन गोळे, सुवर्णा आसाराम ज-हाड, तनुजा आत्माराम उबाळे हे विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र झाले असून त्या निमित्त त्यांच्या गुण गौरवाचा कार्यक्रम शाळेत आयोजित करण्यात आला

होता. शाळेचे उपक्रमशील शिक्षक नितीन रोहोकले सर यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्याना नियमित व सातत्यपूर्ण अभ्यासाने परीक्षेत निश्चित यशस्वी व्हाल याची खात्री करून दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री गणेश जाधव सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करत इतर मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रेरीत केले.

तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आत्माराम उबाळे , आसाराम ज-हाड, राधाकिसन गोळे , सुरेश धुपे , योगशिक्षक गजानन पांडुरंग पुरी सर यांनी विदयार्थ्यांचे कौतुक करत पुढील शिक्षणाविषयी शुभेच्छा दिल्या. दिलीप तौर सर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली .

Share now