आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे यांची साहित्य संमेलनाच्या स्थळी भेट.

जालना जिल्हा प्रतिनिधी :- मदंबा साहित्य नगरी स्वामी रामानंद शिक्षण प्रसारक मंडळ शहागड रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेचे बेचाळीसावे मराठवाडा साहित्य संमेलन २०२२ घनसावंगी येथील संत रामदास कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय घनसावंगी या ठिकाणी पार पडत आहे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री शिवाजीराव चोथे हे परिसरातील सर्व नागरिक समाजसेवी व्यक्ती तथा

इतर प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या समवेत हे संमेलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत आज दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी जालना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ अक्षय शिंदे तथा घनसावंगी पोलीस ठाणे निरीक्षक श्री सोमनाथ नरके यांनी महाविद्यालयात प्रांगणातील साहित्य नगरीतील मुख्य सभागृह बैठक व्यवस्था सुरक्षा व्यवस्था विश्रामगृह आदी ठिकाणांची वैयक्तिक पाहणी करून योग्य त्या सूचना केल्या यावेळी श्री शिवाजी चोथे यांच्या समवेत श्री प्रभाकर मामा पवार, सतीश सोडाणि , प्राचार्य राजेंद्र परदेशी, पांढरे , पंढरीनाथ उगले आदींची उपस्थिती होती

Share now