आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

जिल्ह्यातील विवाह,राजकीय, किंवा धार्मिक कार्यक्रमात 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. जिल्हाधिकारी आंचल गोयल

परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी काढले सुधारित आदेश

शेख अजहर हादगावकर. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना शुक्रवार मध्य रात्री पासून लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार बंदीस्त जागेत किंवा मोकळ्या जागेत होणाऱ्या विवाह सोहळ्याकरिता 50 व्यक्तींनाच उपस्थित राहता येणार आहे. बंदीस्त किंवा मोकळ्या जागेत होणारे कोणतेही मेळावे किंवा कार्यक्रम मग ते सामाजिक , सांस्कृतिक

राजकीय किंवा धार्मिक असो त्या ठिकाणी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तींपर्यंतच मर्यादीत असणार आहे . मृतांवरील अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असणार असून या संदर्भात शुक्रवारपासून कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे. संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रमुखांनी याची कठोर अंमलबजावणी करावी . आदेशाचे पालन न झाल्यास व्यक्ती , संस्था, समूह यांच्याविरुध्द कारवाई केली जाईल, असेही त्यात स्पष्ट केले आहे


शासनाने कोरोना विषाणूचा ( कोव्हीड -19 ) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2 , 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. त्याअन्वये जिल्हाधिकारी ह्या त्यांच्या कार्यक्षेत्रात

कोव्हीड 19 ) नियंत्रण आणण्यासाठी व त्यांच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना त्यांचे कार्यक्षेत्रात सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले आहे. ज्याअर्थी, महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकारामुळे कोरोना कोव्हीड ) 19

(विषाणूचा प्रसार होण्याचा धोका लक्षात घेता , कोरोना कोव्हीड ) -19 ( विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही तातडीच्या उपाययोजनेचा भाग म्हणून दि . 25 डिसेंबर 2021 रोजी लागू केलेल्या आदेशात सुधारणा केली आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव त्याअर्थी, जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष आंचल गोयल यांनी साथरोग प्रतिबंध कायदा 1897 , आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 अन्वये प्राप्त अधिकारातून 31 डिसेंबर 2021 पासून आदेश दिले आहे. त्यानुसार बंदिस्त जागेत किंवा

मोकळ्या जागेत होणा – या विवाह सोहळ्यासाठी उपस्थितांची कमाल संख्या 50 व्यक्तीपुरती मर्यादित असेल. बंदीस्त किंवा मोकळ्या जागेत होणारे कोणतेही मेळावे किंवा कार्यक्रम, मग सामाजिक , सांस्कृतिक , राजकीय किंवा धार्मिक असी , बंदिस्त जागेत असो किंवा मोकळ्या जागेच्या ठिकाणी उपस्थितांची कमान संख्या 50 व्यक्तींपर्यंत मर्यादित असेल.

अंत्यसंस्कारांच्या बाबतीत जास्तीत जास्त उपस्थितांची संख्या 20 लोकांपर्यंत मर्यादित असेल. या आदेशातील अटी व शर्तींचे उल्लंघन केल्यास संबंधिताविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग नियंत्रण कायदा 1897 अन्वये पुढील कठोर कारवाई करण्यात येईल याची गांभिर्याने नोंद घ्यावी.

या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक , मनपा आयुक्त व मुख्याधिकारी, सर्व नगर परिषदा, नगर पंचायत यांच्यावर राहील. या आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती , संस्था अथवा समूह हे साथरोग प्रतिबंधक कायदा 1897 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि भारतीय दंड संहिता 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला

अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. हे आदेश व या आधी अस्तित्वात असलेल्या इतर सर्व सूचना निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहतील

Share now