आम मुद्देताज्या घडामोडी

जिल्ह्यातील सरासरी एक लाख साठ हजार हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले. पालकमंत्री नवाब मलिक

अतिवृष्टीने बाधित क्षेत्राचे पंचनामे करुन तात्काळ प्रस्ताव सादर करा

शेख इफ्तेखार बेलदार. पाथरी तालुक्यातील हदगाव नखाते येथे व सर्व परभणी जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी व पुरपरिस्थिती निर्माण झालेली असुन, या आपत्तीमुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे करुन लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे अल्पसंख्याक विकास औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे मंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी

दिली.जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक सभागृहात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांच्या नुकसानीबाबत आयोजित आढावा बैठकीत पालकमंत्री नवाब मलिक बोलत होते. या बैठकीस खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुराणी, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी आंचल गोयल, पोलिस अधीक्षक जयंत मीना यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी पालकमंत्री श्री. मलिक म्हणाले की, ७ सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली असुन या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे जिल्ह्यात सुमारे १ लाख ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असुन शेतकऱी बांधव मोठ्या संकटाचा सामना करत आहे. याकरीता बाधित

झालेल्या शेतकऱ्यांचे तात्काळ पंचनामे पूर्ण करुन लवकरच मदत मिळवून देण्यात येईल. येणाऱ्या काही दिवसात हवामान खात्याने पुन्हा पाऊस होणार असल्याचे संकेत दिले आहेत. अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने राज्य शासन लवकरात-लवकर निर्णय घेऊन मदत करणार असल्याचे श्री मलिक यावेळी म्हणाले. जिल्ह्यातील कोरोनाचा आढावा घेतांना पालकमंत्री म्हणाले, की जिल्ह्यात तपासणीची संख्या वाढवून रुग्ण संख्या शुन्यावर आणण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील लसीकरणांचे प्रमाण कमी असुन जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण करावे. तसेच किमान एक लस

घेणाऱ्यांनाच त्यांचे लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासुनच शासकीय कार्यालयात प्रवेश देण्यात यावा व जिल्ह्यात लसीकरणाला गती द्यावी अशी सूचना केली. प्रारंभी जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील २७ सर्कल मध्ये ६५ टक्कयापेक्षा जास्त पाऊस झाला होता. त्या भागातील नुकसान झालेल्या शेतीचे सुमारे ५० टक्के पंचनामे पूर्ण झाले आहेत. तसेच या अतिवृष्टीमुळे १२७ गावे बाधीत झाली आहेत. तसेच या आपत्तीत २ व्यक्तींचा मृत्यू झाला असून लहान-मोठी ४४ जनावरांची जीवीत हानी झाली आहे. तसेच १ हजार ६१ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. शासन नियमानुसार सर्व बाधीतांना प्रशासनामार्फत मदत देण्यात आली आहे. तसेच

जिल्ह्यातील विविध विभागातंर्गत येणाऱ्या पायाभुत सुविधा बाधीत झाल्या असुन, यासाठी ८१ कोटी ७४ लाख रुपये अंदाजीत निधीची आवश्यकता असल्याची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केली.बैठकीपूर्वी पालकमंत्री नवाब मलिक यांनी पाथरी तालुक्यातील हदगाव शिवारातील शेतकरी रामप्रसाद तुकाराम नखाते व प्रकाश मुकुंद नखाते यांच्या कापूस पिकाची तर सेलू तालुक्यातील ढेंगळी पिंपळगाव येथील शेतकरी प्रभाकर सोळुंके यांच्या कापसाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मानवत तालुक्यातील

कोल्हा शिवारातील शेतकरी विश्वनाथ भिसे यांच्या सोयाबीनची तर ताडबोरगाव येथील शेतकरी अमृत खरवडे यांच्या सोयाबीन या पिकांची प्रत्यक्ष शेतात जावुन पाहणी केली.या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, महापालिका आयुक्त देविदास पवार, उपविभागीय अधिकारी संजय कुंडेटकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी लोखंडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांच्यासह जिल्ह्यातील विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Share now