आम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

जिल्ह्यातील स्वच्छता मोहिमेत अजून १८ घंटागाड्यांची भर परभणी जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर

जिल्ह्यातील स्वच्छता मोहिमेत अजून १८ घंटागाड्यांची भर; तत्कालीन जि.प. अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या पाठपुराव्याला यश

परभणी जिल्हा प्रतिनिधी. परभणी जिल्हा परिषद त्कालीन अध्यक्षा निर्मलाताई विटेकर यांच्या संकल्पनेतून, त्यांनी त्यांच्या कार्यकाळात विशेष पाठपुरावा करून ग्रामीण भागातील स्वच्छतेकडे प्रकर्षाने लक्ष दिले.

त्यांच्याच कार्यकाळात मंजूर झालेल्या, ग्रामीण स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासंबंधी भूमिकेतून जिल्हा परिषद स्तरावर १५ व्या वित्त आयोगातून १८ घंटागाड्यांचे वितरण जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींना माझ्या हस्ते झाले. या ग्रामपंचायत क्षेत्रात कचरा व्यवस्थापनासाठी या घंटागाड्या आवश्यक होत्या. आता तेथील परिसर स्वच्छ ठेवला जाऊन संभाव्य रोगराईला आळा बसणार आहे.

ताडकळस, एरंडेश्वर, केकरजवळा, लिंबा, रामपुरी, पिंपळगाव, राणीसावरगाव, शेलगाव, उखळी, विटा या गावांतील ग्रामपंचायतींच्या स्वच्छता मोहिमेत या गाड्या सहभागी होऊन स्वच्छतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण भूमिका बजावतील, यात शंका नाही. यावेळी उपस्थित या दहा गावातील प्रशासकीय अधिकारी, सरपंचांना त्यांच्या गावातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी सरपंच गजानन अंबोरे, रितेश काळे, संतोष लाडाने, विष्णू चव्हाण, दुर्गादास साठे, रामभाऊ आरगडे, राजेभाऊ जाधव, विलास कोकाटे, राजेभाऊ सावंत, मदनराव भोसले व सर्व गावांतील ग्रामसेवक, प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Share now