ताज्या घडामोडीमनोरंजन

जि.प. प्रा.शाळा रेनाखळी. उज्वल गुणवत्तेची अखंडित परंपरा राखणारी शाळा

सत्कार केलेले गुणवंत विद्यार्थी,सर्व शिक्षकवृंद, उपस्थित पालक व गावकरी

रेनाखळी प्रतिनिधी. अहमद अन्सारी पाथरी तालुक्यातील दुर्गम भागात असलेली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेनाखळी ही उज्वल गुणवत्ता असलेली शाळा असून ह्या शाळेतून प्रत्येक वर्षी एन. एम.एम.एस.सारख्या स्पर्धा परीक्षा ,स्कॉलरशिप परीक्षा , व विविध स्पर्धेत गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडवणारी शाळा असून याही वर्षी ह्या इयत्ता ५वीचे स्कॉलरशिप स्पर्धा परीक्षेमध्ये चार विद्यार्थी पात्र झाले आहे.
२०२१-२२ स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरलेले विद्यार्थी


१) पुनम उद्धव इंगळे
२) वैष्णवी अर्जुन इंगळे
३) आकांक्षा भागवत हरकळ
४) वैभव प्रकाश ताल्डे


सदर विद्यार्थ्यांना जेष्ठ शिक्षक एन.एल.पवार ,बी.जी.गव्हाणे,राऊत सर यांचे मार्गदर्शन मिळाले असुन त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.यावेळी मुख्याध्यापक तांबुळे सर , हुलवणे सर , एडके सर, बाबळे सर भामरे सर,कदम सर, शेख सलीम सर,शेख.एकबाल सर व्हि.टी. गव्हाणे सर,तसेच

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उद्धव इंगळे, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक प्रकाश आश्रोबा ताल्डे , भागवत हरकळ, अर्जुन इंगळे प्रमोद हरकळ, संपतराव हरकळ,धुराजी हारकळ व गावकरी उपस्थित होते या यशाबद्दल सर्वांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले.

Share now