टोकियो ऑलिंम्पिक 2020 साठी निवड झालेल्या अविनाश साबळे यांच्या आई-वडीलांचा जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार
बिग जिल्हा प्रतिनिधी,दिनांक .20 ऑलिम्पिक स्पर्धा 2020 जापान मधील टोकीयो या शहरामध्ये दिनांक .23 जुलै ते 8 ऑगस्ट 2021 या कालावधीत होत आहेत. टोकीयो ऑलिम्पिक 2020 स्पर्धेकरीता बीड जिल्हातून निवड झालेल्या अविनाश साबळे यांच्या आई श्रीमती वैशाली आणि वडील श्री. मुकुंद साबळे यांचा जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.

जिल्ह्यातील अविनाश साबळे आपल्या भारत देशाचे प्रतिनिधी म्हणून स्पर्धेत सहभागी होत असून त्यामुळे बीड जिल्ह्याचे नाव मोठे झाले आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण जिल्हावासीयांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देत आहोत, असे प्रतिपादन प्र.जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले
सदर कार्यक्रम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हाधिकारी कार्यालय बीड मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे आयोजित करण्यात होता. यावेळी निवासी जिल्हाधिकारी मच्छींद्र सुकटे, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, ऑलिंपिक खेळाडू अविनाश यांचे वडील मुकुंद साहेबराव साबळे , आई वैशाली मुकुंद साबळे, भाऊ योगेश साबळे मांडवा चे सरपंच अशोक मुटकुळे लेखाधिकारी बीबी ढोले , क्रीडा अधिकारी श्रीमती सुप्रिया गाढवे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्रातून 10 खेळाडूंची निवड झालेली आहे. त्यात अविनाश साबळे ( अॉथलेटिक्स 3000 मी स्टिपलचेस )हा बीड जिल्हयातील मांडवा, आष्टी येथील खेळाडू आहे. त्याचा निवडीच्या अनुषंगाने त्यांचे आई-वडील , खेळाडू अविनाश जेथे घडले त्यांचे बालपण व शिक्षण झाले . त्या मांडवा गावातील सरपंच श्री मुटकुळे आणि शाळेतील शिक्षक सुमित शेटे , क्रीडाशिक्षक संजय सोले, भाऊ योगेश साबळे आदींचा यावेळी जिल्हाधिकारी श्री ठोंबरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राजेंद्र खेडकर सर व क्रीडा कार्यालयाचे श्री.योगेश आवढाळ, श्री.रमाकांत डिंगणे, श्री. योगेश करांडे, श्री. ज्ञान्नेश्वर धंडारे, श्री.सचिन जाधव, श्री.किशोर काळे, श्री. रवि घुमरे आदी उपस्थित होते.