ताज्या घडामोडीमनोरंजन

डाइनामिक कोचिंग क्लास जालना येथे १० व १२ वी च्या गुणवंतांचा सत्कार

जालना येथे १० व १२ वी च्या गुणवंतांचा सत्कार

जालना प्रतिनिधी :- शहरातील युसूफ कॉलनी जुना जालना परिसरातील डाइनामिक कोचिंग क्लास येथे १० वी आणि १२ वी च्या गुणवंतांचा सत्कार सोहळा पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अक्षय भैय्या गोरंटयाल उपस्थितीत होते.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.रफिक सर ( कॉग्रेस सेवा दल ) मा.डॉ.आदील खान ( मेहर हॉस्पिटल ) मा.शकील भाई ( नगरसेवक ) मा.अता मोहम्मद बख्शी सर,मा.मुफस्सीर कुरेशी ( युवा नेता )

डाइनामिक कोचिंग क्लासेस च्या संचालक जावेद सरांच्या हस्ते अक्षय भैय्या गोरंटयाल व प्रमुख पाहुण्याचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अता मोहम्मद बख्शी सर यांनी केले.सन २०१७ पासून डाइनामिक कोचिंग क्लासचे विद्यार्थी जालना जिल्ह्यात उर्दु माध्यमातून जिल्ह्यात प्रथम येथ आहे.डाइनामिक कोचिंग क्लासचे एकूण ७ ते ८ विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण घेऊन पास झाले आहेत.यावर्षी जोबीया बागवान‌ या विद्यार्थ्यांनीने ९५.२० % मार्क घेऊन जालना

जिल्ह्यात उर्दु माध्यमातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.मोहम्मद हुजैफ याने ९५ % मार्क घेऊन जिल्यात दुसरा आलेला आहे.फायजा तजीन ९३.६०% अन्सारी आहद ९२.२०% अबीदा सय्यद ९१.% अलमास सय्यद ९०% सेना फिरदौस ९०% या विद्यार्थ्यींनी ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे.तसेच २८ विद्यार्थीनींनी ८०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे.ईयत्ता बारावी सायन्स मध्ये अल्तमश शेख

,बुशरा शेख,आयशा खान या विद्यार्थ्यांनीनी डाइनामिक कोचिंग क्लास मधुन प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे.डाइनामिक कोचिंग क्लासेस चे संचालक जावेद सरांनी शेवटी आभार व्यक्त करताना सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच सर्व पालकांचे डाइनामिक कोचिंग क्लासेस वर सतत ठेवलेल्या विश्वासा बद्दल आभार व्यक्त केले

Share now