ताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना

डाळींचे उत्पादन वाढविण्यासाठी केंद्र सरकारच्या उपाययोजना 21 जूलैकृषी मंत्रालय डाळींचे प्रमुख उत्पादन घेणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( एनएफएसएम ) अंतर्गत डाळीच्या बियाण्यांचेछोटे संच ( मिनिकिट्स ) वितरीत केले जातात . डाळींच्या बियाण्यांच्या मिनिकिट्सचे जिल्हानिहाय वाटप आणि वितरण संबंधित राज्य सरकारांद्वारे केले जाते . राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान ( एनएफएसएम ) अंतर्गत थेट लाभ हस्तांतरण ( डीबीटी )

योजनेची राज्यांकडून अंमलबजावणी केली जाते . आधार सक्षम यंत्रणेचा वापर करून राज्ये थेट लाभ हस्तांतरणाद्वारे निश्चित केलेल्या लाभार्थ्यांना लाभ हस्तांतरित करतात.गुजरात , तामिळनाडू आंध्रप्रदेश , महाराष्ट्र इत्यादी अनेक राज्यांमध्ये बियाण्यांच्या मिनिकिट्सचे वितरण आधार सक्षम प्रणालीद्वारे झाले आहे . बियाणे मिनीकिट्स कार्यक्रमांतर्गत डाळींचे उत्पादन आणि उत्पादकता यावर प्रामुख्याने राज्य सरकारचे क्षेत्रीय अधिकारी आणि मुख्य सचिव / कृषी उत्पादन आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील

राज्य अन्न सुरक्षा अभियान कार्यकारी समिती यांच्यामार्फत प्राथमिक देखरेख ठेवली जाते . याशिवाय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्तरावरील देखरेख पथकाद्वारे ( एनएएलएमओटीएस ) बियाणे मिनीकिट्स वापरलेल्या शेतांवर क्षेत्रीय भेटी दिल्या जातात . राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – डाळी कार्यक्रमाअंतर्गत विविध उपाययोजनांच्या परिणामी

201516 मधील 16.32 दशलक्ष मेट्रिक टन डाळींच्या उत्पादनाच्या तुलनेत 2020-21 मध्ये 25.56 दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत डाळींच्या उत्पादनात वाढ झाली . ( तिसरा आगाऊ अंदाज ) .याच काळात डाळांची उत्पादकताही 655 किलो / हेक्टरवरून 878 किलो / हेक्टरपर्यंत वाढली आहे . केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री नरेंद्रसिंह तोमर यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली .

Share now