तन्जीम ए ईन्साफच्या जिल्हाध्यक्ष रियाज शेख, कोषाध्यक्ष शेख आरीफ तर सहसचिव सद्दाम पटेल यांची निवड
नायगाव प्रतिनिधी : ऑल इंडिया इंडिया तन्जीम ए इन्साफ संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी शेख रियाज चांदपाशा कोषाध्यक्षपदी शेख आरीफ तर सहसचिव सद्दाम पटेल यांची निवड करण्यात आली. ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफचे प्रदेशाध्यक्ष एस.जी.शुत्तारी, महासचिव अशफाक सलामी यांच्या सूचनेनुसार माजी राष्ट्रीय सचिव फारूख अहमद,भाकपा नेते काॅ.प्रदिप नागापुरकर यांनी जिल्हा कार्यकारिणी घोषित केली.
यावेळी आमेर अरसिल, मोहम्मद कासिम, ईशान खान, अब्दुल समी यांची उपस्थिती होती. यावेळी अल्पसंख्यांक समाजात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक समस्यांवर जनजागृती करणारी, व अन्यायाविरूद्ध लढा देणारी देशपातळीवरील एकमेव संगठन ऑल इंडिया तन्जीम ए इन्साफ’ ची नांदेड जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली.
जिल्हाध्यक्ष पदी शेख रियाज चांदपाशा तर जिल्हा कार्याध्यक्षपदी सुनिल सोनसळे, महासचिव वलियोद्दीन फारुखी बिलोली,हरपाल सिंग गुलाटी,जिल्हा समन्वयक इर्शाद पटेल देगलूर, जिल्हा उपाध्यक्ष शेख मलंग लोहा व म.मोईज धर्माबाद, मुख्य संघटक अब्दुल हकीम भोकर, सचिव शेख हुसेन रायवाडीकर,सहसचिव सद्दाम पटेल नरसीकर, कोषाध्यक्ष शेख आरिफ नायगाव,



