आम मुद्देताज्या घडामोडी

दत्तोबा संस्थानात दर गुरुवारी एक दिवशीय आरोग्य सुविधा पुरवा

दत्तोबा संस्थानात दर गुरुवारी एक दिवशीय आरोग्य सुविधा पुरवा आम आदमी पार्टीचे निवेदन

गंगाखेड प्रतिनिधी. शंकरवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या दत्तोबा संस्थान दत्तवाडी येथे दर गुरुवारी आरतीसाठी जमणाऱ्या भाविकांसाठी एक दिवशीय आरोग्य सुविधा पुरविण्याची मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने गंगाखेड तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे गुरुवारी( 4 ऑगस्ट) करण्यात आली. महातपुरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत दत्तवाडी हे संस्थान येते. दत्तोबा संस्थान येथे दर गुरुवारी हजारो भाविक भक्त दुपारी आरतीसाठी जमा होतात. शंकरवाडी,

महातपुरी, शिवाजीनगर ,सुरवाडी, शिखरवाडी, पडेगाव ,उमला नाईक तांडा, खादगाव, बंनपिंपळा, उंदरवाडी, वैतागवाडी, वडगाव, तीवठाणा, गोविंदवाडी आदी भागातील भाविक भक्तासह तालुक्याच्या ठिकाणाहूनही येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. आरतीच्या निमित्ताने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये लहान बालके, महिला, ज्येष्ठ नागरिक यांचाही समावेश असतो. या सर्वांना आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी आरोग्य विभागाने या ठिकाणी आरतीच्या दिवशी दर गुरुवारी सकाळी 11 ते 3 या वेळात तात्पुरते आरोग्य सुविधा केंद्र उभारावे अशी मागणी

आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली. निवेदनावर परभणी जिल्हा उपाध्यक्ष सखाराम बोबडे पडेगावकर, सामाजिक कार्यकर्ते शेख अमजद महातपुरीकर, राहुल साबणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. लेखी निवेदन तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात गुरुवारी देण्यात आले. ही मागणी मान्य झाल्यास परिसरातील लोकांना प्राथमिक आरोग्य सुविधेसाठी शहराकडे धाव घेण्याची गरज पडणार नाही.

Share now