Uncategorized

दहशतवाद विरोधी पथक परभणी व बॉम्ब – नाशक पथक परभणी वतीने परभणी शहरात दहशतवादी कार्यवाही

पाथरी जन्मभुमी न्युज

अजहर शेख हादगावकर

दहशतवाद विरोधी पथक परभणी व बॉम्ब – नाशक पथक परभणी वतीने परभणी शहरात दहशतवादी कार्यवाही , घातपात टाळणे व जनजागरन मोहीम . दि .१८ जुलै २०२१ रोजी मा.पोलीस अधीक्षक परभणी श्री जयंत मीना साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन साहेब यांचे मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी सेल व बॉम्ब शोधक – नाशक पथक परभणी यांनी परभणी शहरामध्ये आगामी काळात साजारी होणाऱ्या आषाढी एकादशी व बकरी ईद सणाचे अनुषंगाने दहशतवादी कारवाया तसेच जनतेस बॉम्ब सदृश्य

वस्तु / बेवारस वस्तु मिळुन आल्यास घ्यावयाची खबरदारी व तात्काळ पोलीसांना संपर्क करणे बाबत सुचना देवुन प्रात्यक्षीकाद्वारे जनजागृती करण्यात आली . सदर मोहीमे दरम्यान परभणी शहरातील रेल्वे स्थानक व बस स्थानक परिसरातील पार्कीग परिसर , पार्सल विभागाची बॉम्ब शोधक – नाशक पथकाकडील अत्याधुनिक यंत्राच सहाय्याने तसेच श्वानासह संयुक्तरित्या घातपात विरोधी तपासणी व प्रात्यक्षीक करण्यात आली . सदर कार्यवाही दरम्यान बॉम्ब शोधक व नाशक पथक , परभणी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक , श्री . के.बी.बोधगिरे तसेच दहशतवाद विरोधी पथकाचे पोलीस उप निरीक्षक श्री . विश्वास खोले , सपोउपनि शेख इब्राहिम पोह भारत नलावडे , चापोना अरुण कांबळे सुधीर काळे तसेच बॉम्ब शोधक – नाशक पथकाचे पोह संतोष वाव्हळ ,

पोना शिवाजी काळे , प्रविण घोंगडे , शेख इम्रान , पोशि प्रेमदास राठोड व चापोना शेख शकील तसंच श्वान ओरिएन , बसस्थानक चौकीवरील पोशि पडघन , डेपो मॅनेजर दयानंद पाटील हे सहभागी होते . तरी सर्व व्यापारी व नागरिकांनी त्यांचे आजुबाजचे परिसरात , सार्वजनिक ठिकाणी संशयीत चीज वस्तु , संशयीत व्यक्ती आढळुन आल्यास त्वरीत पोलीस नियंत्रण कक्ष परभणी ०२४५२-२२६२३३ , दहशतवाद विरोधी पथक परभणी ९ ८२३२४२४ ९ ६ , बॉम्ब शोधक नाशक पथक परभणी ८३२ ९ १४ ९९९ ६ येथे कळवावे असे पोलीस प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आलेआहे .

Share now