Uncategorizedआम मुद्देताज्या घडामोडीमहाराष्ट्र रोखठोक

दिव्यांगांना अंतौदय योजनेत समाविष्ट करुन त्यांना पिवळे रेशन कार्ड उपलब्ध करा. शाहूराव गवारे

पाथरी शहर प्रतिनिधि अन्वर खान. पाथरी शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग , विधवा महिला यांच्या करिता केंद्र व राज्य शासनाने सन 2013 च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग व्यक्ती , विधवा महिला व हमाल इत्यादी व्यक्तींना अंतौदय योजनेत समाविष्ट करुन पिवळे रेशन कार्ड देण्यात यावे . पाथरी शहर व ग्रामीण भागातील दिव्यांग व विधवा महिला जवळपास 400 ते 450 व्यक्ती आहेत या व्यक्तींनी

पाथरी तहसिल कार्यालय , पाथरी पुरवठा विभाग येथे पिवळे राशन कार्ड उपलब्ध करुण देण्यासाठी अर्ज केलेला आहे . पंरतू अद्याप अंतोदय योजनेतील पिवळे कार्ड दिव्यांग व्यक्ती व विधवा महिला यांना पिवळे रेशन कार्ड आठ दिवसाच्या आत उपलब्ध करुण देण्यात यावे . अन्यथा आपल्या कार्यालया समोर अमरण उपोषण करण्यात येईल याची दखल घ्यावी .असे एका निवेदनाद्वारे कडविण्यात आले या निवेदन देताना प्रहार चे शाहूराव गवारे दिव्यांग संघटनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश दहिवाळ मनोज कुमार माने अफसर खान पठाण आधी प्रहार जनसेवक उपस्थित होते

Share now