दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र ता ऊमरी येथे दिव्यांगाचा मेळावा संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलिकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
ऊमरी प्रतिनिधी.तालुक्यातील ऊमरी येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला. या मेळाव्यात लोकप्रिय नेते मा.मारोतराव काळे गुरूजी यांना ऊधोगपती पुरस्कार ़व गुळ उत्पादक महाराष्ट्र राज्यउप अध्यक्षपदी निवड झाल्यामुळे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष व कार्यकर्त्यांनी सत्कार करण्यात आला.प्रथम रयतेचे राज्य स्वराज संस्थापक श्रीछञपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन कार्त्रक्रमाला सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चधतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर व प्रमुख पाहुणे मारोतराव कवळे गुरूजी,प्रल्हाद पाटिल, गजानन वंहिदे, माधवराव पाटिल डोईफोडे ईतर पाहुण्याचा सत्कार करण्यात आले. प्रस्ताविक ता ऊपअध्यक गजानन वंंहिदे यांनी दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व दिव्यांग बांधवांच्या अडचणीत संघटनेने शासन स्तरावर कशा प्रकारे सोडवणूक केली आहे त्यासाठी आपले सहकार्य महत्त्वाचे असल्यामुळे सर्वानी संघटित होण्याचे अव्हाहण केले.दिव्यांग संघटनेचे ता ऊपअध्यक्ष माधवराव डोईफोडे पाटिल
यांनी आपले संस्थापक अध्यक्ष मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवानी संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी शंभर सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत सर्व सवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा स्थापन करून आपला हक्कासाठी डाकोरे पाटिल यांनी करीत असलेल्या दिनदुबळ्याच्या लढाईत आमच्या भागातील लोकप्रिय असलेले नेते यांनी खर्या ईश्वर दिव्यांगाच्या लढाईला यश मिळवून देण्यासाठी मा. कवळे गुरुजी यांनी पालकमंत्री यांच्या कडे शिफारस करून प्रत्येक कमिटीत सदस्य पदी नियुक्ती करून दिव्यांगाना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी विनंती केली
प्रमुख पाहुणे काळे गुरूजी यांनी दिव्यांग बांधवानी संघटित करण्यासाठी डाकोरे पाटिल आपल्याना एकञित करून शासश प्रशासन यांना जागे करण्यासाठी अनेक प्रकारचे आंदोलन केल्यामुळे आज आपणास गाव पातळीवर सवलती मिळत आहेत मी पण आपल्या अडचणी सोडविण्यासाठी वेळोवेळी आपल्या सोबत आहे व आपल्या सर्व अडचणी पालकमंत्री यांच्या समोर मांडुन न्याय देण्याचे आश्वासन दिले

अध्यक्षीय समारोप मा डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांनी संघटितपणे संघर्ष केल्याशि़वाय न्याय मिळत नाही आपल्या संघर्षामुळे गावपातळीवर सवलती मिळत आहेत. दिव्यांगानी आपल्या शरीरातील व्यंग असल्यामुळे खचित न होता दिव्यांग बुध्दीने चातुर्य असुन त्या बुध्दी चा वापर करून दिव्यांग होने का गम नहि हम किसी से कम नही हे दाखविण्यासाठी संघर्षात सामिल होऊन आपला हक्क मिळवून घेण्यासाठी सर्व प्रकारच्या दिव्यांग बांधवांनी संघटितपणे नांदेड जिल्ह्यातील कुंभकर्ण शासन प्रशासनास जागे करण्यासाठी दि 28 जुन21ते 30 जुलै 21 पर्यंत चालु असलेल्या ग्रामपंचायत समोर थालीनांदा आंदोलनात225 गावात 26 जुलै 21 पर्यंत आंदोलन करून जागे करण्यासाठी प्रयत्न केला. 30 जुलै पर्यंत सर्व गावातील दिव्यांगानी ग्रामपंचायत समोर थालीनांद आंदोलन करून दिव्यांगाना
मिळणाऱ्या चाळीस सवलती साठि गाव तेथे दिव्यांग संघटनेच्या शाखा स्थापन करून दिव्यांगाची शक्ती निर्माण करून कुंभकर्ण शासन प्रशासन खडबडून जागे करण्यासाठी बोर्डाचे स्थापना करावी.दिव्यांगाना कोणीही आधार देत नसल्यामुळे शासनाने जंगल जमीन, गायरान जमीन, मसुुरा जमीन, परमपुक जमीन, सिलिंग जमिन दिव्यांग बांधवांच्या नावावर दिले तर त्या दिव्यांगाना मान सन्मान व सर्व सामान्य जनतेसाठी त्यांना सन्मानाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य त्यांना जगवतील व शासनास महसुल जमा होऊन शासनाच्या तिजोरीत वाढ होईल. दिव्यांग बांधवांना
ग्रामपंचायत, पचायत समिती ,जिल्हा परिषद,नगरपंचायत, नगरपालिका महानगर पालिका, खासदार, आमदार निधी, घरकुल, ईत्यादी सवलतीसाठी आपण संघटितपणे संघर्ष करण्यासाठी सहभागी व्हावे असे आव्हान डाकोरे पाटिल यांनी केले अध्यक्षीय समारोप प्रसंगी डाकोरे पाटिल यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ता अध्यक्ष गजानन वंहिदे,माधवराव डोईफोडेपाटिल, ताराबाई मठपती, कोडीबा दमनबोईनवाड, नामदेव सूर्यवंशी, सुरेश वाघमारे,अशोक, हंडेवार, विष्णु परतवाडा, ,दगडु परतवाडशादुल शेख ईत्यादी ,परिसरातील दिव्याग बांधव या मेळाव्यास शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते असे प्रसिध्दी पञक दिले