आम मुद्देमनोरंजन

देवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन

देवकतवाडी येथे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते सभागृहाचे भूमिपूजन देवकतवाडी येथे आमदार स्थानिक विकास निधी मधून सभामंडप बांधकामाकरिता दिला अकरा लक्ष रुपयांचा निधी.

गंगाखेड/प्रतिनिधी:मोसिन खानआज २१ जुलै रोजी मौजे देवकतेवाडी ता. गंगाखेड येथे आ. डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी आपल्या स्थानिक विकास निधी मधून ११ लक्ष रुपये निधी सभामंडप बांधकामाकरिता देण्यात आला होता या सभामंडप बांधकामाचे भूमिपूजन आ. डॉ.रत्नाकर गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले.

अत्यंत अडचणीत असताना या मतदारसंघातील लोकांनी मला या अडचणीतून वर काढले आहे. त्यामुळे या लोकांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. त्यांच्या सुखदुःखात मी सदैव सोबत राहणार असल्याचे यावेळी आमदार गुट्टे यांनी सांगितले या प्रसंगी जि.प. सदस्य किसनराव भोसले,राजेश फड,पंचायत समिती

सभापती मुंजाराम मुंडे, पं.स.सदस्य नितीन बडे,तालुका प्रभारी हनुमंत मुंडे, तालुका अध्यक्ष शिवाजी पवार, राजेभाऊ बापु सातपुते, चेअरमन तथा माजी उपसभापती रामप्रसाद सातपुते,सरपंच बन्सीधर पवार, उपसरपंच लक्ष्मण राठोड,माजी सरपंच शेषराव पवार,ग्रामपंचायत सदस्य दत्ता पवार यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Share now