आम मुद्देताज्या घडामोडी

दोन दिवसाच्या उपोषणानंतर मागण्या मान्य कारवाई करण्याचे लेखी पत्र मिळाल्याने उपोषण सोडले

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती महाराष्ट्र राज्य वतीने विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे दि.12 ऑगस्ट 2021 रोजी पासून बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले होते हे उपोषण दोन दिवस झाल्यानंतर विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेबांनी चौकशी करून कारवाई करण्याचे लेखी पत्र दिल्यामुळे उपोषण उपोषणा तून माघार घेण्यात आले. हा उपोषण अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे

संस्थापक अध्यक्ष मोहम्मद रफी सौदागर व प्रदेशाध्यक्ष शब्बीर शेख यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनात करण्यात आले होते या उपोषणामध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यातील असंख्य पदाधिकारी उपस्थित होते. 1)एकच व्यक्ती दोन नावाने शासनाची करतो फसवणूक अशोक नावाने रास्त भाव दुकान तर आसाराम नावाने शाळेत शिपाई ची नोकरी! फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.

2) देवणी पं.स.विस्तार अधिकारी यांनी बोगस अपंग प्रमाणपत्र काढून त्या आधारे पदोन्नती व जास्तीचे भत्ते घेऊन भ्रष्टाचार केल्या प्रकरणी कारवाई ची मागणी.

3) चापोली ग्रा.पं.ने अंगणवाडी चे पेवर ब्लॉक न बसविताच बिल उचलून भ्रष्टाचार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी.

4) निलंगा येथील इनामी जमिनीवर बेकायदेशीर भाडे पट्टा करुन मोबाईल टावर बसवल्या प्रकरणी दोषी वर कारवाईची मागणी.

5) आतनूर ग्रा.प.मध्ये 14 व्या वित्त आयोगातून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई ची मागणी.

6) निलंगा न.प. मधिल अभियंत्यांची विभागीय चौकशी करून कारवाईची मागणी करण्यात आली औरंगाबाद येथे उपोषणामध्ये संस्थापक अध्यक्ष मोहम्मद रफी सौदागर व प्रदेशाध्यक्ष शब्बीर शेख व अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते

Share now