ताज्या घडामोडीमनोरंजनराजकिय घडामोडी

नखाते यांच्यात राजकारणासोबत समाजकारण करण्याचे कौशल्य.

अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बाबाजाणी दुर्राणी यांचे गौरोदगार.कृषी उत्पन्न बाजार समितीत घेतला कार्यक्रम.

संपादक अहमद अन्सारी. राजकारणासोबतच समाजकारणाला महत्त्व देऊन जिद्द,चिकाटी आणि नैतीक कार्यप्रणालीद्वारे शैक्षणिक संस्था, बँक व बाजार समीती अशा विविध क्षेत्रातील विकसनशिल नेतृत्व म्हणून अनिलराव नखाते यांचे नांव पुढे येते त्यांचे कौशल्य हे पदाधिकारी यांचेसाठी निश्चितच अनुकरणीय आहे.असे गौरोदगार आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी काढले.

पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात रविवारी सायंकाळी ७ वा.अनिलराव नखाते यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आ.बाबाजाणी दुर्राणी, सत्कारमुर्ती अनिलराव नखाते, गंगाधर गायकवाड, सुभाष कोल्हे, नारायणराव आढाव, दादासाहेब टेंगसे ,विजय सिताफळे, चक्रधर उगले ,प्रभाकर शिंदे ,सदाशिव थोरात ,एकनाथ शिंदे, विश्वंभर साळवे ,राजेभाऊ ढगे, दिगंबर लिपणे ,नितीन शिंदे, बाळासाहेब कोल्हे, बाबासाहेब कुटे, राजेश गलबे,कैलास शिंदे बाबासाहेब शिंदे शिवाजी कुटे, शिवराज नखाते, साहेबराव बिटे यांची उपस्थिती होती. प्रारंभी आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी अनिलराव नखाते यांना फेटा बांधुन त्यांचा सत्कार करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बोलतांना आ.बाबाजाणी. दुर्राणी म्हणाले की,वाढदिवस साजरा करतांना आपण समाजासाठी काय केले हे मागे वळून पाहण्याची उत्तम संधी असते.प्रत्येकाच्या आयुष्यातील निघुन गेलेल्या आणि आयुष्यात नव्याने येणाऱ्या क्षणाचे मजेशीर किस्से आ.दुर्राणी यांनी सांगितले. अनिलराव नखाते यांच्या बाबतीत बोलतांना आ.दुर्राणी म्हणाले की,चिकाटी, काम पुर्ण होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा आणि शासनस्तरावरून बदलत असणारी नियमावली याचा अभ्यासावर आधारीत समाजकारण आणि राजकारणाचा सुयोग्य संयोग साधन्यात अनिलराव नखाते यांचा हातखंडा भारी आहे असा उल्लेख त्यांनी केला.यावेळी एकनाथ शिंदे, प्रभाकर शिंदे,चक्रधर उगले यांनी मनोगत व्यक्त केले.

तर सत्काराला उत्तर देतांना अनिलराव नखाते म्हणाले की,राजकारण अथवा समाजकारण मला यशस्वी होण्यासाठी राजकीय पाठबल आ.बाबाजाणी दुर्राणी साहेब यांनी दिले.महाविकास आघाडी सरकार कालावधीत शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या अशा वाल्मिकी अँग्रो प्रोड्युसर कंपनी पाथरी ला आ.दुर्राणी साहेब यांनी मान्यता मिळवून दिली.प्रत्येक कार्यकर्त्यांच्या सुख दुखात धावुन जाणारे आ.दुर्राणी साहेब यांचे पाठबळाने आम्हाला समाजसेवा करण्याची संधी मिळत आहे.असे नखाते म्हणाले.प्रास्ताविक एकनाथ शिंदे यांनी केले तर नारायणराव आढाव यांनी अभार मानले.——————————————————————

Share now