ताज्या घडामोडीमनोरंजन

नरसी येथील साईबाबा मंदिरात गुरु पोर्णिमा साजरी

नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर :-गुरु पोर्णीमेच्या निमित्ताने येथील साई बाबा मंदिरात भजन , प्रवचन यासह साईबाबांच्या मुर्तीचा धार्मिक मंत्रोच्चारात अभिषेक करुन साई भक्त नंदकिशोर नरसीकर यांच्या तर्फे भाविकांना अल्पोपहार देउन सांगता करण्यात आली. येथील राम मंदिराच्या शेजारी असलेल्या साईबाबा मंदिरात गुरू पोर्णिमेच्या निमित्ताने दोन

दिवसापासून भजन, प्रवचण, धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दि.२४ जुलै रोजी सकाळी मंदिराचे पुजारी ह.भ.प.रामकिशन महाराज यांच्या हस्ते साईबाबांच्या मुर्तीची विधिवत मंत्रोच्चारात अभिषेक महापुजा करण्यात आली. तर नरसी येथील जीवन विकास प्राथमिक शाळेतील शिक्षिक नंदकिशोर रामराव नरसीकर (टोकलवाड) गुरुजींच्या वतीने उपस्थित भजनी मंडळातील वारकऱ्यांना दस्ती,टोपी,पिस देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांनी धार्मिक सोहळ्यात उपस्थित असलेल्या सर्व

भक्तजनांन अल्पोपहार देऊन धार्मिक सोहळ्याची सांगता करण्यात आली. हा धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह.भ.प.पीराजी महाराज, गणपती महाराज पाटे, पांडुरंग महाराज पाटे, केरबाजी राजलवाड, बापुराव कोरे, भीमराव बडूरे, दिंगबर कोरे, बोधणे, लक्ष्मणराव टोकलवाड, बालाजीराव टोकलवाड, रमेश पंदनवाड, आकाश नरसीकर, गंगाधर वडगावे, हनमंत कोकणे, देवीदास बुके, यांनी परिश्रम घेतले तर यावेळी बाबा महाराज पाटे , पांडुरंग

पांचाळ,यांच्या सह गावातील , महिला पुरुष भक्त गण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.नांदेड जिल्हा प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर जाहिरात साठी व बातमी साठी संपर्क साधावा मोबाईल नबरः 9960484886

Share now