नवीन व जून्या कब्रस्तान मध्ये विविध कामासंदर्भात न.प.ला मुस्लिम समाज तर्फे दिले निवेदन
गावातील कब्रस्तान मध्ये विविध कामासंदर्भात न.प.ला मुस्लिम समाज तर्फे दिले निवेदन
शेख अजहर हादगावकर. माजलगाव शहरातील जून्या कब्रस्तान व नवीन कब्रस्तान मनूर रोड मधिल विविध समस्या निर्माण झालेली आहे. अनेक दिवसापासून कब्रस्तान मध्ये हाय मस्ट बंद असून रात्री कधी अंत्यसंस्कार करण्यासाठी गेल्यावर कब्रस्तान मध्ये अडचण निर्माण होते.तसेच नूकतेच नवराञ महोत्सव चालू असून मनूर रोड ने मनूर येथील जागृत देवस्थान असुन याच रस्त्याने भाविकभक्त दर्शनासाठी जातात.
त्या रस्त्यावर कब्रस्तान असुन तेथील लाईट व हायमस्ट दूरूस्त केले तर भावीक भक्तांचे तेथील रहिवाशी व मयत लोकांना घेवून जाणार्या अडचणी निर्मान होणार नाही.म्हणून मुस्लिम समाज बांधवाच्या वतिने निवेदन देवून होणारी परवड थांबवावी .परंतु नगरपरिषद कार्यालय कडून कसल्याच प्रकारची देखरेख करण्यात येत नाही. तसेच अनेक दिवसापासून वेटिंग हॉलचे बांधकाम थांबलेले असून त्याकडे नगरपरिषद ने दुर्लक्ष केल्याने तसेच पडून आहे
.कब्रस्तान चे गेट तसेच पडून आहे व पाण्याची पण व्यवस्था नाही. अनेक ठिकाणी कंपाउंड वॉल कोसळल्याने आत मध्ये जनवरी वावरत आहेत.व रस्त्यावर मोठमोठे खड्डे सूद्धा आहेत.मूख्याधिकारी यांनी लक्ष देवून तात्काळ कामे करावीत नसता विविध स्वरूपाचे आंदोलन करु असं इशारा दिला , त्यावेळी,फेरोज इनामदार,नोमण चाऊस, मुस्ताक कुरेशी, अशोक ढंगे,मोझम कुरेशी, अविनाश ढंगे, सय्यद नासेर , अखिल कुरेशी,आमेर खतीब, यांनी केली मागणी