ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र रोखठोक

निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी शेख उस्मान यांची निवड

परभणी जिल्हा प्रतिनिधी. रभणी येथील बांधकाम कामगारांना विविध योजनेचे देय लाभ मंजूरीसाठी कायदेशीर लढा देऊन न्याय मिळवून देण्यासाठी सदैव अग्रेसर असणारे तसेच विविध शासकीय अल्पसंख्याक योजनांची अंमलबजावणी साठी प्रयत्न करुन न्याय हक्क मिळवून

देण्यासाठी प्रयत्न करणारे कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या बद्दल कोरोना योद्धा म्हणून जिल्हाधिकारी हस्ते सन्मानित असलेले परभणी येथील एमडीओ संघटनेचे जिल्हा कार्यकारी अध्यक्ष तथा महापालिकेच्या फेरीवाला समितीचे सदस्य शेख उस्मान शेख इस्माईल यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत कॉ. शंकर पुजारी यांनी राहणार सांगली जिल्हा, निवारा बांधकाम कामगार संघटना आयटक

महाराष्ट्र राज्य च्या परभणी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली मुंबई येथे एका कार्यक्रमप्रसंगी निवारा बांधकाम संघटनेचे महाराष्ट्र अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी शेख उस्मान यांना नियुक्तीचे पत्र दिले याप्रसंगी निवारा बांधकाम कामगार संघटनेचे ठाणे जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष कॉ. रमेश जाधव पालघरचे जिल्हाध्यक्ष कॉ . सुनिल पाटील आदि मान्यवरांची उपस्थिती

होती शेख उस्मान शेख इस्माईल यांची निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल महेबुब खान, पठाण सय्यद रफीक पेडगावकर , मुजीब पठाण , शेख चांद, आवेस खान पठाण , शेख गणी , शेख शमशोद्दिन , शेख यामीन , नसीर पठाण , शेख बाबु , शेख इम्रान , स्वागत करुन पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

Share now