ताज्या घडामोडीमनोरंजन

पत्रकार संघाच्या संघटक पदी सुहास देशमाने यांची निवड

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्नित गंगाखेड तालुका ग्रामीण पत्रकार संघाची बैठक दिनांक 8 ऑगस्ट रविवार रोजी पत्रकार संघ कार्यालयात पार पडली. ही बैठक पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री उद्धव चाटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्वानुमते सुहास देशमाने यांची पत्रकार संघाच्या संघटक पदी बिनविरोध निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या बैठकीवेळी

ज्येष्ठ पत्रकार गोविंद यादव, ज्येष्ठ पत्रकार रमेश कातकडे पत्रकार संघाचे अध्यक्ष उद्धव चाटे, गोपाळ मंत्री, भागवत जलाले, सचिन कोटलवार, तुषार उपाध्याय, वैजनाथ आंधळे, मोहसीन खान, सय्यद गोस, राजकुमार मुंडे, सुमित देशमाने यांची उपस्थिती होती. या निवडीनंतर सुहास देशमाने यांचा पत्रकार संघाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

Share now